नवी दिल्ली: भारतात या वर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकपची तयारी सुरू झाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर ही स्पर्धा होणार आहे. देशात १२ वर्षानंतर वर्ल्डकप होत असून याआधी २०११ साली वर्ल्डकप झाला होता. तेव्हा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ना भारतात वर्ल्डकप झाला ना टीम इंडियाने कधी वर्ल्डकप जिंकला.आता बीसीसीआयने अशी तयारी सुरू केली आहे ज्यामुळे भारताला पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यास मदत होईल. मीडिया रिपोर्टनुसार वर्ल्डकपमधील पहिली मॅच चार ऑक्टोबर रोजी होऊ शकते. अद्याप वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झाले नाही.

बीसीसीआयकडून वनडे वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू झाली आहे. इंडियन्स एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होऊ शकते. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. इतक नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत चेन्नईतील एम ए चिंदबरम स्टेडियम मध्ये होऊ शकते.

IPLमध्ये परदेशी कर्णधाराने भारतीय खेळाडूचा गेम केला; टीम इंडियाच्या सुपर स्टारला बाहेर केलं अन्…
एका रिपोर्टनुसार वर्ल्डकपमधील लढती नागपूर,मुंबई, दिल्ली, लखनौ, त्रिवेंद्रम, बेंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकात, राजकोट , धर्मशाला आणि इंदूर या ठिकाणी होऊ शकतात. भारतीय संघाच्या लढतीचा विचार केल्यास या लढती अशाच मैदानावर होण्याची शक्यता आहे जेथे फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळते. वर्ल्डकपसाठी अद्याप बराच कालावधी आहे, त्यामुळे पिच स्वत:च्या मर्जीनुसार तयार करता येऊ शकते. यामुळे भारताला घरच्या मैदानांवर खेळणे अधिक फायदेशीर ठरले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश फिरकीपटूंना त्या पद्धतीने खेळू शकत नाहीत ज्या पद्धतीने भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ खेळतात.

कर्णधाराच्या एका निर्णयाने अखेरच्या ओव्हरमध्ये झाला चमत्कार; विजयाचा घास हिरावून घेतला
पाकिस्तानच्या अधिकतर लढती चेन्नई आणि बेंगळुरू येथे आयोजित केल्या जाऊ शकतात. या दोन शहरातील अंतर कमी आहे. त्यामुळे प्रवासात अधिक वेळ जाणार नाही. तसेच सुरक्षा हा देखील एक मुद्दा आहे. बांगलादेशच्या लढती कोलकात आणि गुवाहाटी येथे हो शकतात. जेणे करून चाहत्यांना अधिक प्रवास करावा लागू नये.

भारताने २०११ साली अखेरचा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर संघाला या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. आता बीसीसीआयच्या प्लॅननुसार जर गोष्टी झाल्या आणि टीम इंडियाने शानदार कामगिरी केली तर भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकेल.

Harry Brook : एका मॅचचा हिरो ठरतोय संघासाठी डोकेदुखी; १३ कोटींच्या खेळाडूला किती काळ पोसणार
या वर्ल्डकपच्या निमित्ताने भारतीय भूमीत टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात २०१६ नंतर पहिली मॅच होणार आहे. सध्या आयपीएलचा १६वा हंगाम सुरू आहे. त्यानंतर बीसीसीआयकडून वर्ल्डकप २०२३चे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here