करोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर धोनी नेमका कुठे आहे, हे कोणालाही माहिती नव्हते. पण तेव्हा धोनी हा आपल्या कुटुंबियांबरोबर रांची येथे राहत होते. आपल्या कुटुंबियांबरोबर तो काही काळ व्यतित करत होता. यावेळी धोनी आणि त्याची मुलगी झिव्हा यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. पण त्यावेळी धोनीची पत्नी साक्षीचा एकही फोटो पाहायला मिळाला नव्हता. पण सध्याच्या घडीला झिव्हाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये झिव्हाच्या मांडीवर एक तान्हं बाळ आहे आणि झिव्हा या लहान मुलाचा सांभाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
झिव्हाचा हा फोटो व्हायरल झाल्यावर चाहत्यांमध्ये एक संभ्रम पाहायला मिळाला होता. कारण हे तान्ह बाळ नेमकं कोणाचं आहे, याचा सोध चाहते घेत होते. काही चाहत्यांनी तर धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांना पूत्ररत्न झालं आहे, असेही म्हटले होते. कारण सध्याच्या करोनाच्या काळात घरामध्ये जास्त बाहेरील व्यक्ती येत नाही. त्याचबरोबर एवढं लहान तान्हं बाळ धोनीच्या घरी कोणी घेऊ येईल, अशीही शक्यता नसल्याचे चाहत्यांना वाटते.
झिव्हाचा हा व्हायरल झालेला फोटो इंस्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. या फोटोखाली काही चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. धोनी आणि साक्षी तुमच्या घरी पाळणा हलला का, तुम्हा दोघांचेही अभिनंदन.., अशा कमेंट्सही या फोटोखाली काही चाहत्यांनी केल्या आहेत. पण या कमेंट्सला अजून उत्तर मिळालेले नाही. आतापर्यंत जवळपास पाच लाख लोकांनी हा फोटो पाहिला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसत आहे.
काही चाहत्यांनी तर हार्दिक आणि नताशा झालेले बाळ झिव्हाच्या मांडीवर खेळत आहे, असेही म्हटले आहे. पण ही गोष्ट खरी असल्याचे वाटत नाही, त्याचबरोबर या गोष्टीचा कोणीही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी धोनीच्या घरी पाळणा हलला असल्याचे चाहत्यांना वाटत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times