करोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर धोनी नेमका कुठे आहे, हे कोणालाही माहिती नव्हते. पण तेव्हा धोनी हा आपल्या कुटुंबियांबरोबर रांची येथे राहत होते. आपल्या कुटुंबियांबरोबर तो काही काळ व्यतित करत होता. यावेळी धोनी आणि त्याची मुलगी झिव्हा यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. पण आता कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धोनीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
आयपीएलमधील धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स या संघाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी एका जागेवर बसून बासरी वाजवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला असून त्यांना या व्हिडीओतील धोनी कान्हा म्हणून संबोधले आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही व्हिडीओ शेअर झाल्यामुळे तो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरीही गूड न्यूज आल्याचे पाहायला मिळते आहे. कारण धोनीची मुलगी झिव्हा एका लहान मुलाला सांभाळत असल्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा फोटो धोनीची पत्नी साक्षीनेच पोस्ट केला आहे. त्यामुळे धोनीच्या घरी गूड न्यूज असल्याचे दिसत आहे.
झिव्हाचा हा व्हायरल झालेला फोटो इंस्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. या फोटोखाली काही चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. धोनी आणि साक्षी तुमच्या घरी पाळणा हलला का, तुम्हा दोघांचेही अभिनंदन.., अशा कमेंट्सही या फोटोखाली काही चाहत्यांनी केल्या आहेत. पण या कमेंट्सला अजून उत्तर मिळालेले नाही. आतापर्यंत जवळपास पाच लाख लोकांनी हा फोटो पाहिला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसत आहे.
काही चाहत्यांनी तर हार्दिक आणि नताशा झालेले बाळ झिव्हाच्या मांडीवर खेळत आहे, असेही म्हटले आहे. पण ही गोष्ट खरी असल्याचे वाटत नाही, त्याचबरोबर या गोष्टीचा कोणीही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी धोनीच्या घरी पाळणा हलला असल्याचे चाहत्यांना वाटत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times