नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने नुकताच त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. क्रिकेटच्या देवावर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या हाफ सेंच्युरीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. २४ एप्रिलला सचिनचा वाढदिवस झाला. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचा केकदेखील मॅचदरम्यान कापण्यात आला होता.आता सचिनने इन्स्टाग्रामवर आपल्या कुटुंबासह एक खास फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर दिसते आहे. सचिनने त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबासोबतही सेलिब्रेट केला. सचिनने यावेळी आपल्या लेकाला अर्जुनलाही मिस करत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सचिनने फोटो शेअर करत एक कॅप्शन लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये त्याने म्हणटलं, तुम्ही प्रत्येकवेळी अर्धशतक करत नाही. पण जेव्हा कधी अर्धशतक केलं जातं तेव्हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या व्यक्तींसोबत त्याचा आनंद साजरा करणं खास असतं. एका गावात माझ्या टीमसोबत, माझ्या कुटुंबासोबत ५०व्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केल्याचं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सचिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो, पत्नी अंजली आणि मुलगी सारा दिसते आहे. सचिनचा लेक अर्जुन या सेलिब्रेशनमध्ये त्याच्यासोबत नाही. त्याबाबत सचिनने पोस्टमध्ये लिहिलं असून या खास क्षणी तो अर्जुनला मिस करत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

मास्टर – ब्लास्टरने पोस्टमध्ये तो एका गावात असल्याचं म्हटलं आहे. सचिन त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोकणातील मालवणात गेला आहे. त्याने पोस्टमध्ये लोकेशन शेअर करत याची माहितीही दिली आहे.

सचिनचा लकी नंबर अर्जुनच्या पाठीशी; जर्सीचे खास कनेक्शन!

दरम्यान, सचिन तेंडुलकरला त्याच्या ५०व्या वाढदिवशी खास गिफ्ट त्याच्या मुलाने अर्जुन तेंडुलकरने दिलं. सचिनच्या लेकाने अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळत आपला आयपीएल डेब्यू केला. त्याने आपली पहिली मॅच कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळली होती. हेच सचिनसाठी सर्वात मोठं वाढदिवसांचं गिफ्ट होतं.

भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीची छेडछाड; रात्री घरी जाताना दोघांनी पाठलाग केला आणि…


आयपीएलमुळे अर्जुन त्याच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करू शकला नाही. अर्जुनच्या वडिलांनीही आपल्या लेकाला त्यांच्या खास दिवशी मिस केल्याची पोस्ट केली आहे. दरम्यान, अर्जुनने आयपीएल २०२३ मध्ये एकूण ४ सामने खेळले असून या सामन्यात त्याने ३ विकेट घेतल्या आहेत.Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here