आयपीएलमुळे फक्त भारतातच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये नवा उत्साह येणार आहे. यासाठी बीसीसीआय दिवस रात्र काम करत आहे. विशेषत: करोना काळात आयपीएलमधील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकारी आणि अन्य लोकांना जैव वातावरणात सुरक्षित ठेवण्याचे मोठे आवाहन बीसीसीआय समोर आहे.
वाचा-
इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडूंना एकत्र ठेवताना जर एखाद्या व्यक्तीला करोना झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण स्पर्धेव होऊ शकतो. अशातच अद्याप खेळाडूंची जमाजमव आणि सराव सुरू होण्याआधी आयपीएलमध्ये कोरनाने प्रवेश केला आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचे दिशांत याग्निक यांना करोनाची लागण झाली आहे. १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या साठी सर्व संघ तयारी करत असताना राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे. संघाच्या अधिकृत ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे.
वाचा-
आमच्या संघाचे फिल्डिंग कोच यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संघाकडून करण्यात आलेल्या चाचणीत ते पॉझिटिव्ह आले आहेत. संघाने केलेल्या अन्य सर्वांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या असून त्याच अहवाल बीसीसीआयला देण्यात आला आहे, असे राजस्थानने म्हटले आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामातील सदस्यांपैकी करोना पॉझिटिव्ह झालेले दिशांत याग्निक हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात आयपीएलचे सर्व संघ युएईला रवाना होतील. राजस्थान रॉयल्सने २००८ च्या पहिल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I really like and appreciate your blog post.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.