यंदाच्या आयपीएलचे प्रायोजकत्व रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीला मिळणार असल्याचे दिसत आहे. पण जर पतंजलीला आयपीएलचे प्रायोजकत्व मिळाले तर या स्पर्धेचा लोगो असेल तरी कसा, पाहा…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका घोषणेमुळे पंतजलीला आयपीएलचे प्रायोजकत्व मिळू शकते, असे म्हटले जात आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही पतंजलीला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. त्यामुळेच आयपीएलचे प्रायजोकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजारावाला यांनी सांगितले.

जेव्हा एखाद्या कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व मिळते तेव्हा लोगोमध्ये महत्वाचे बदल केले जातात. त्याचबरोबर आयपीएलच्या चषकामध्येही बदल होतात. त्यामुळे जर आता आयपीएलचे प्रायोजकत्व पतंजलीला मिळाले तर आयपीएलचा लोगो नेमका कसा असेल, हे उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक ट्विट करून दाखवून दिले आहे. या लोगोमध्ये आयपीएलचे नाव आहे. त्याचबरोबर या लोगोमध्ये योगामधील एक आसन दाखवून त्या व्यक्तीच्या हातातमध्ये बॅट देण्यात आली आहे. हा लोगो आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला रामदेव बाबा आयपीएलच्या प्रायोजकत्वाच्या शर्यतीत आहेत, पण त्यांचे यापूर्वी आयपीएलबाबतचे मत चांगले नव्हते. यापूर्वी आयपीएलबाबत रामदेव बाबा म्हणाले होते की, ” चीअरलीडर्समुळे क्रिकेट हा खेळ अश्लील झाला आहे. हे भारताच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आयपीएल हा एक मोठा जुगार आहे, त्याचबरोबर आयपीएलमुळे सट्टेबाजी वाढत असल्याचेही पाहायला मिळत आहे. ”

पतंलजीला जर आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवायचे असेल तर त्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाचा वाटा असू शकतो, असे म्हटले जात आहे. करोनाच्या काळात मोदी यांनी एक घोषणा केली होती. ही घोषणा जर लक्षपूर्वक ऐकली तर पतंजलीला आयपीएलचे प्रायोजकत्व मिळू शकते, असे म्हटले जात आहे. करोनाच्या काळात मोदी यांनी आत्मनिर्भर भारत, अशी एक घोषणा केली होती. या घोषणेनुसार पतंजली ही भारतातील कंपनी असून तिला आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवणे सोपे होईल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here