नवी दिल्ली: आयपीएल २०२३ मधील प्ले ऑफची चुरस आणखी रंगली आहे. हंगामात रविवारी ७ मे पर्यंत ५२ लढती झाल्या आहेत. साखळी फेरीत आता फक्त १८ सामने शिल्लक आहेत. विशेष म्हणजे साखळी फेरी अखेरच्या टप्प्यावर आली असताना १० पैकी एकही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला नाही. म्हणजे गुणतक्त्यातील पहिल्या क्रमांकापासून दे अखेरच्या स्थानावरील सर्वांना अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.गुणतक्त्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स सर्वात तळाला आहे. प्लेऑफची शर्यात चुरशीची होण्यास राजस्थान रॉयल्सचा पराभव जबाबदार आहे. गेल्या ६ पैकी ५ लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ही लढत अधिक चुरशीची झाली आहे. जाणून घ्या १० पैकी १० संघांना कसे काय प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

१) गुजरात टायटन्स- माजी विजेत्या गुजरात संघाची कामगिरी दमदार झाली आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना फक्त १ विजय हवा आहे. सलग दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजरातला फक्त एक विजय गरजेचा आहे. जर त्यांनी उर्वरीत तिनही लढती गमावल्या तरच त्यांच्यावर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याचा धोका निर्माण होईल. त्यांच्या लढती या मुंबई, हैदराबाद आणि आरसीबीविरुद्ध आहेत.

२) चेन्नई सुपर किंग्ज- गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईचे ११ सामन्यात १३ गुण आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना शिल्लक ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवावा लागले. असे झाले तर त्यांचे १७ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये पोहोचतील. पण यासाठी त्यांना नेट रनरेट देखील चांगले करावा लागेल. चेन्नईच्या उर्वरीत लढती दिल्ली, केकेआर आणि दिल्ली विरुद्ध होणार आहेत.

IPL 2023: जेव्हा सर्वजण मैदान सोडून पळाले तेव्हा दिग्गज आला मदतीला; सर्वजण करत आहेत सलाम

३) लखनौ सुपर जायंटस- दुसरा हंगाम खेळणाऱ्या लखनौ संघाचे ११ सामन्यात ११ गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरीत ३ लढतीत विजय मिळवावा लागले. त्याच्या लढती हैदराबाद, मुंबई आणि केकेआरविरुद्ध होणार आहेत.

४) राजस्थान रॉयल्स- २००८ साली पहिल्या आयपीएलचे विजेतेपद आणि गेल्या वर्षी उपविजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थानने हंगामातील पहिल्या ५ पैकी ५ लढती जिंकल्या. पण अखेरच्या ६ पैकी ५ मध्ये पराभव आणि एकात विजय झालाय.

५ ) रॉयल चॅलेंज बेंगळुरू- १० सामन्यातील १० गुणांसह आरसीबी ५व्या स्थानावर आहे. पण आरसीबीसाठी काळजीचा विषय आहे त्याचे नेट रनरेट, जे सध्या वजा आहे. त्यांना उर्वरीत ४ पैकी चार लढतीत विजय मिळून प्लेऑफ मध्ये पोहोचण्याची संधी आहे. जर अन्य गोष्टी आरसीबीच्या बाजूने आल्या तर ३ विजय देखील पुरेसा ठरेल.

IPL 2023:… तर यामुळे होत आहे मोठी धावसंख्या; कोणालाच कळाले नाही, रोहितने सांगितले खरं कारण
६) मुंबई इंडियन्स- सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईची अवस्था अवघड आहे. सहाव्या स्थानावर असलेल्या मुंबईला पुढील ४ लढतीत विजय मिळून १६ गुणांसह प्लेऑफमध्ये जागा मिळवता येईल. पण यासाठी त्यांना अन्य संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागले.

७) पंजाब किंग्ज– गुणतक्त्यात सातव्या स्थानावर असेलल्या पंजाबचे १० सामन्यात १० गुण आहेत. ते अन्य संघांपेक्षा फार मागे नाहीत. चार सामन्यात चार विजय मिळवल्यास त्याचे १८ गुण होऊ शकतील.

८) कोलकाता नाईट रायडर्स- हैदराबादविरुद्ध विजय मिळून केकेआरने प्लेऑफची शर्यत कामय ठेवली आहे. ८ गुणांसह ते आठव्या स्थानावर आहेत. जर उर्वरीत ४ मॅच जिंकले तर त्यांना १६ गुणांसह प्लेऑफचे तिकीट मिळवता येईल. पण या सर्व लढती त्यांच्यासाठी करो या मरो असतील. एक पराभव त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर करेल.

९) सनरायझर्स हैदराबाद- १० सामन्यातील ८ गुणांसह हैदराबाद ९व्या स्थानावर आहे. त्यांच्या अद्याप ४ लढती शिल्लक असून यात विजय मिळवल्यास १६ गुण होऊ शकतील. पण प्लेऑफसाठी हे चार विजय पुरेशे ठरणार नाहीत, त्यासाठी त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

१०) दिल्ली कॅपिटल्स- गेल्या ५ पैकी ४ सामन्यातील विजयासह दिल्लीच्या संघाने प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान अजून टिकवले आहे. १० सामन्यात ८ गुणांसह अखेरच्या स्थानावर असलेल्या दिल्लीला शिल्लक ४ लढती जिंकाव्या लागतील आणि अन्य मॅचचे निकाल त्यांच्यासाठी सकारात्मक होईल याची वाट पहावी लागले.

मार्क वूड ठरला IPL 2023 मधील ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज !

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here