भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने काही दिवसांपूर्वीच सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा यांना पूत्ररत्न झाले होते. पण हा आनंद साजरा केल्यावर हार्दिक आता आयपीएलच्या तयारीला लागला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलच्या तयारीचा हार्दिकचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी हार्दिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलाचा फोटो शेअर केला होता. या फोटोला चाहत्यांनी चांगला प्रतिसादही दिला होता. त्यानंतर आपल्या बाळाचे नामकरणही हार्दिकने केल्याचे म्हटले जात होते. पण आता या सर्व गोष्टी आटपून हार्दिक आता आयपीएलसाठी चांगलाच घाम गाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हार्दिक हा आयपीएलमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्स या संघाला अविभाज्य भाग आहे. गेल्या आयपीएलनंतर हार्दिक जास्त सामने खेळलेला नाही. त्यामुळे त्याला जर या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर त्याला फिटनेस कमवावा लागेल. त्यामुळे हार्दिकने आता व्यायाम कराला लागला आहे. व्यायामशाळेतील हार्दिकचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक वजन उचलून व्यायाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्यायाम करत असतानाही हार्दिक चांगला घाम गाळत असल्याचेही पाहायला मिळाले आहे.

यावर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे. पण आतापर्यंत युएईमध्ये एकही आयपीएलमधील संघ पोहोचू शकलेला नाही. सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणार असून त्यानंतर त्यांना युएईला पाठवण्यात येणार आहे. यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये रंगणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने दुबई, आबुधाबी आणि शारजा या तीन ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी केली होती. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सनेच जेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावर्षी पहिला सामना खेळण्याचा मान त्यांचाच असेल. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होईल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here