कोलकाता : आयपीएल २०२३ मध्ये काल सोमवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला होता. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत चालला. थरारक झालेल्या या सामन्यात केकेआरने विजय मिळवला. एक वेळ सामना हाताबाहेर गेला आहे असं वाटत असताना आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी वादळी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. संघाला विजय मिळाला असला तरी कर्णधार नितीश राणा याच्यावर मात्र कारवाई झाली आहे.

केकेआरसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या सामन्यात संघाला अखेरच्या चेंडूवर विजय मिळाला. विजयासाठी मिळालेले मोठे आव्हान केकेआरने कर्णधार राणा, अनुभवी रसेल आणि युवा रिंकू सिंग यांच्या खेळाच्या जोरावर पूर्ण केले. या विजयामुळे केकेआरचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे. मात्र, नितीश राणा याच्यावर स्लो ओव्हर रेटमुळे मॅच रेफ्रींनी कारवाई केली. या चुकीसाठी त्याच्याकडून १२ लाख रुपयांचा दंड आकारला गेला आहे.

कॅप्टन असावा तर असा! नितीश राणामुळेच दिसलं ‘रसेल’ वादळ, फ्लॉप ठरत असताना दिला असा कानमंत्र
स्लो ओव्हर रेटशी संबंधित केकेआरचा कॅप्टन नितीश राणाची ही पहिली चूक होती. त्यामुळे त्याच्या मॅच फी मधून १२ लाख रुपये कापण्याच आले. म्हणजेच त्याच्यावर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश राणाने स्लो ओव्हर रेटशी संबंधित आपली टूर मॅ रेफ्रीकडे कबूल केली. त्यामुळे पुढे सुनावणीची गरज पडली नाही.

षटकांची गती संथ राखल्याने कारवाई झालेला राणा या हंगामातील पहिला कर्णधार नाही. यापूर्वी केएल राहुल, फाफ डू प्लेसिस, शिखर धवन आणि संजू सॅमसन यांनी ही चूक केली होती.

‘मला आता सवय झाली आहे…’, शेवटच्या चेंडूवर सामना जिंकल्यानंतर रिंकू सिंग काय म्हणाला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here