कोलकाता: मुंबई इंडियन्सविरुद्ध स्टंपतोड गोलंदाजी करत जगाला वेड लावणाऱ्या अर्शदीप सिंगची जादू कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चालली नाही. सोमवारी ८ मे ला झालेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगने अर्शदीपविरुद्ध चौकार लगावल्याने पंजाब किंग्जला पराभूत व्हावे लागले. रिंकू सिंगच्या बॅटला लागून चेंडू सीमारेषा ओलांडताच अर्शदीप सिंग निराश होऊन जमिनीवर बसला. या विजयासह केकेआरने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.अर्शदीपच्या डोळ्यात अश्रू

रिंकू सिंगच्या विजयी चौकारानंतर अर्शदीपच्या डोळ्यात अश्रू आल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. सामन्यानंतरचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये त्याचा चेहरा पडलेला आहे तर काही फोटोमध्ये त्याच्या डोळ्यात अश्रूही दाटून आले आहेत. अर्शदीपने आपला सर्वतोपरी प्रयत्न केला आणि पण तो सफल होऊ शकला नाही. अखेरच्या षटकात मुंबईविरुद्धच्या सामन्याला वेगळेच वळण देणाऱ्या अर्शदीपने या षटकात रसेलला धावबाद केले, पण तो रिंकूला विजयी चौकार मारण्यापासून रोखू शकला नाही. या मोसमात सातव्यांदा सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. रिंकूने आपली बॅट उगारताच चेंडू सीमारेषेपार गेला आणि केकेआरच्या कॅम्पमध्ये आनंदाची लाट उसळली, तर पंजाबचा संघ इथे निराश झालेला दिसला.

मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजाची संघात एन्ट्री

काय म्हणाला पंजाबचा कर्णधार

सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार धवन म्हणाला, ‘चांगलं नाही वाटतंय. आम्ही सामना गमावला आणि फलंदाजी करणे ही सोपी विकेट नव्हती आणि मला वाटते की आम्ही चांगली धावसंख्या उभारली. सामन्याच्या शेवटी त्यांनी चांगला खेळ दाखवला.’ वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विजयासाठी शेवटच्या षटकात सहा धावा करण्यापासून केकेआरला रोखायचे होते. त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्या ताब्यात ठेवला मात्र तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

धवनने अर्शदीपचे कौतुक करताना म्हटले की, “शेवटचे षटक शानदार होते, अर्शदीपचे उत्कृष्ट प्रयत्न आणि मागच्या सामन्यानंतर त्याने ज्याप्रकारे कमबॅक केले आहे, त्याचे सर्व श्रेय त्याला जाते. शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने सामना नेला हे विशेष. ते खरोखर चांगले होते.”

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

विरोधी संघ सातत्याने मोठी धावसंख्या उभारत असल्याच्या संदर्भात धवन म्हणाला, ‘”मला वाटते की आमच्याकडे चांगला ऑफस्पिनर नाही. जेव्हा डावखुरा फलंदाज मैदानात उतरतो तेव्हा एका टोकाला लेग-स्पिनर असतो आणि दुसऱ्या टोकाला डावखुरा फिरकी गोलंदाज असतो. म्हणूनच मला वाटते की आम्ही आणखी काही धावा देत आहोत.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here