मुंबई: अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू नवीन-उल-हक विराट कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. यांच्यातील हा वाद आता सोशल मीडियावर शीतयुद्धाच्या रूपात समोर येत आहे. नवीन हा आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू आहे. १ मे रोजी आरसीबी आणि लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. या घटनेला १० दिवस झाले असले तरी कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील कटुता कमी झालेली नाही. आता हा वाद केवळ सामान्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून वैयक्तिक झाला आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे.नवीन-उल-हकच्या ताज्या इंस्टाग्राम स्टोरीवरून असेच काहीसे समोर आले आहे, जी त्याने मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान शेअर केली होती. मुंबईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. या सामन्यात १९९ धावांच्या मोठ्या धावसंख्येनंतरही आरसीबी संघाचा मुंबईकडून पराभव झाला.

आरसीबीच्या या पराभवावर नवीनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आंब्याचा काही फोटो शेअर केला असून त्यासोबत त्याने लिहिले आहे, ‘गोड आंबे’. ही एकच स्टोरी नव्हे तर यानंतर त्याने अजून एक स्टोरी टाकली. ज्यामध्ये तो आंब्यांबद्दल बोलत आहे पण समोर मात्र टीव्हीवर मुंबई विरुद्ध आरसीबीचा सामना सुरु आहे. आरसीबी आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान, चाहते नवीनच्या हे इंस्टाग्राम स्टोरीचा संदर्भ विराट कोहलीसोबत जोडत आहेत आणि असे म्हटले जात आहे की नवीन आरसीबीच्या पराभवाचा आनंद घेत आहे आणि विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला आहे याचाही तो आनंद घेत आहे.

Naveen Ul Haq Instagram Story
Naveen Ul Haq Instagram Story

विराटनेही टोमणा मारला

केवळ नवीनच नाही तर विराट कोहलीनेही लखनौ आणि गुजरात सामन्यात असेच काहीसे केले होते. त्या सामन्यात ऋद्धिमान साहाने गुजरातकडून वेगवान फलंदाजी करताना लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यावर विराट कोहलीने लिहिले, ‘वाह काय खेळाडू आहे.’ अशा परिस्थितीत विराट कोहलीला चिडवण्यासाठी नवीनने त्याच्या इंस्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केल्याचे समजते.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

नेमका काय वाद आहे

विराट आणि नवीन यांच्यातील हे प्रकरण १मे ला सुरू झाले. लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नवीन उल हक फलंदाजी करत असताना विराट कोहलीसोबत त्याचा वाद झाला. क्रिझवर उपस्थित असलेल्या अमित मिश्राने मध्यस्थी करून प्रकरण शांत केले असले तरी सामना संपल्यावर प्रकरण आणखीनच चिघळले. सामना संपल्यानंतर विराट कोहलीची लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरसोबत भांडण झाले. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या घटनेनंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातही हो वाद सुरूच आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here