नवी दिल्ली: आशिया कप २०२३ वरून बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. या वादात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पीसीबी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ साठी संघ भारतात पाठवण्यास तयार झाला आहे. याआधी पाकने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन्ही संघातील लढत १५ ऑक्टोबर रोजी होईल.बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आशिया कपसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवला जाणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानने वर्ल्डकपसाठी संघ पाठवणार नाही अशी भूमिका घेतली होती. आता या भूमिकेशी त्यांनी यु-टर्न घेतला आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमधील पहिली मॅच ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. तर फायनल मॅच १९ नोव्हेंर रोजी याच मैदानावर होईल.

जीवन-मरणाच्या लढाईत देवदूतासारखा मदतीला आला; विराटशी वाद घालून व्हिलन ठरलेल्या गौतमने मन जिंकले
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची पहिली लढत चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल असे या रिपोटमध्ये म्हटले आहे. त्याच बरोबर आयपीएलचा १६वा हंगाम संपल्यानंतर वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाणार आहे. वर्ल्डकपसाठी बीसीसीआयकडून एक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. पाकिस्तान संघाच्या लढती चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे होऊ शकतात. वर्ल्डकपमधील लढती अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरूशिवाय कोलकाता, दिल्ली, इंदूर,धर्मशाळा, गुवाहाटी, राजकोट, रायपूर आणि मुंबईत होण्याची शक्यता आहे. मोहाली आणि नागपूर ही दोन शहरे या यादीत नाहीत. सेमीफायनलच्या २ पैकी एक लढत वानखेडे मैदानावर होईल. याच मैदानावर २०११ ची वर्ल्डकप फायनल झाली होती.

आयसीसी वर्ल्डकप २०२३ मध्ये १० संघाचा सहभाग आहे. प्रत्येक संघाच्या ९ लढती असतील. या स्पर्धेत एकूण ४८ लढती होतील. भारताशिवाय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका हे देश थेट पात्र ठरले आहेत. अन्य दोन संघ पात्रता फेरी द्वारे निश्चित होतील.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here