रांची: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सध्या रांची येथील घरी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा धोनी गेल्या एक वर्षात क्रिकेट मैदानावर दिसला नाही. आता युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३व्या हंगामातून धोनी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे.

करोना काळात होणाऱ्या या स्पर्धेत सुरक्षिततेची सर्व काळजी घेतली जात आहे. आयपीएलमधील सर्व खेळाडूंची करोना चाचणी घेऊनच त्यांना संघात सहभागी करून घेतले जाईल आणि त्यानंतर संघ युएईला जातील. धोनी नेहमी प्रमाणे यावेळीही चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून दिसेल.

वाचा-
धोनीच्या करोना चाचणीसाठीचे सॅपल बुधवारी घेण्यात आले. रांचीतील गुरूनानक रुग्णालयात मेडिकल टीमने घरी येऊन त्याचे सॅपल घेतले. आता त्याच्या चाचणीचे रिपोर्ट आज (गुरुवारी )येणार आहेत.

वाचा-
युएईला जाण्याआधी चेन्नई संघाचा एक कॅम्प होणार आहे. कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी करोना रिपोर्ट नेगेटिव्ह येण्याची गरज आहे. त्यानंतर धोनी १४ ऑगस्ट रोजी चेन्नईसाठी रवाना होईल.

वाचा- …

IPLमधील एकाला करोना
कालच राजस्थान रॉयल्स संघाचे फिल्डिंग कोचची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचे फिल्डिंग कोच दिशांत याग्निक यांना करोनाची लागण झाली आहे. १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या साठी सर्व संघ तयारी करत असताना राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे. संघाच्या अधिकृत ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामातील सदस्यांपैकी करोना पॉझिटिव्ह झालेले दिशांत याग्निक हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here