नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हा मैदानावरील त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. विराटच्या या आक्रमकतेवर अनेकांनी आक्षेप आणि नाराजी व्यक्त केली आहे. आता एका जलद गोलंदाजाने विराटवर गंभीर आरोप केला आहे.

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफान हा त्याच्या जलद गोलंदाजीसाठी तसेच त्याच्या उंचीमुळे चर्चेत असतो. ७ फूट १ इंच या जलद गोलंदाजाने आपल्या पहिल्या भारत दौऱ्याबद्दल सांगितले. जेव्हा मी विराटला गोलंदाजी केली तेव्हा त्याला माझ्या चेंडूचा वेग पाहून धक्काच बसला आणि त्याच्या तोंडातून शिवी निघाली.

वाचा-
करिअरच्या सुरुवातीला मोहम्मद इरफानची ओळख मीडियम पेसर अशी केली जात होती. तेव्हा तो १४५ किलो मीटर वेगाने चेंडू टाकत होता. तेव्हा भारतीय फलंदाजांना मोहम्मद १३० ते १३५ किलो मीटर वेगाने गोलंदाजी करतो असे सांगण्यात आले होते.

क्रिककास्ट या शो मध्ये बोलताना मोहम्मद इरफान म्हणाला, भारतीय फलंदाजांना त्यांच्या कोचने माझ्या गोलंदाजीचा वेग १३५ इतका सांगितला होता. खुद्द विराटने मला सांगितले होते की, कोचने आम्हाला तुझ्या गोलंदाजीचा वेग १३०-१३५ इतका सांगितला होता.

वाचा-
भारताविरुद्ध मी पहिली ओव्हर टाकली तेव्हा विराट ड्रेसिंग रुममध्ये होता. मी पहिला चेंडू १४५-१४६च्या वेगाने टाकला. त्यानंतर मी चेंडू १४७ वेगाने टाकला. तेव्हा विराटने सोबत बसलेल्या कोचला विचारले की, मोहम्मदच्या वेगाबद्दल चुकीची माहिती का दिली.

सामना झाल्यानंतर जेव्हा विराटचे आणि माझे बोलने झाले तेव्हा तो म्हणाला, सामना सुरू असताना मी १४८ च्या वेगाने चेंडू टाकला तेव्हा शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलताना माझ्या तोंडातून शिवी आली. हा कसला मीडियम फास्ट बॉलर आहे जो १५०च्या वेगाने गोलंदाजी करतोय.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here