करोनाच्या काळात क्रिकेट सुरु करणे ही सोपी गोष्ट नाही. पण करोनाच्या काळात काही नियम पाळले तर क्रिकेच पूर्वपदावर येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण करोनाचे हे नियम खेळाडूंनी पाळायला हवेत. जर खेळाडूंनी करोनाचे नियम पाळले नाहीत, तर क्रिकेट पुन्हा एकदा बंद करावे लागेल, असे म्हटले जात आहे.
करोनाच्या काळात क्रिकेट खेळत असताना काही गोष्टी महत्वाच्या असतात. सर्वात महत्वाचा नियम म्हणजे कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, पण हीच चूक एका क्रिकेटपटूने केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण संघावर आता करोनाचे संकट येणार का, याबाबत भिती वाटत आहे.
नेमकं घडलंय तरी काय…सध्याच्या घडीला क्रिकेट खेळण्यासाठी काही नियम बनवले आहेत. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ‘बायो बबल’ बनवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही व्हायरस क्रिकेट मैदानापासून ते खेळाडूंच्या हॉटेलपर्यंत पोहोचू शकत नाही. पण त्यासाठी खेळाडूंनी संघाबरोबर राहायला हवे आणि संघाबाहेरील व्यक्तीला भेटू नये, असा एक नियम आहे. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिझने हा नियम मोड्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण संघाला आता करोनाचा धोका असू शकतो, असे म्हटले जात आहे.
पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर हफिझ हा आपल्या हॉटेलबाहेर एका वृद्ध महिलेला भेटला होता आणि त्याचा फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. पण यामध्ये हफिझने नियम मोडल्याचे पाहायला मिळाले. हफिझ ज्या वातावरणात गेला होता किंवा ज्या व्यक्तीला भेटला तिथे करोना व्हायरस असेल तर त्याची बाधा सर्व खेळाडूंना होऊ शकते. कारण त्या व्यक्तीला भेटल्यावर हफिझ संघ सहाकाऱ्यांनाही भेटला असेल. त्यामुळे पाकिस्तानच्या संघावर आता संकट येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
सध्याच्या घडीला हफिझला पाच दिवसांसाठी आयसोलेशनध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर आता त्याच्या दोन करोना चाचण्या होणार आहेत. या चाचण्यांमध्ये तो निगेटीव्ह सापडला तरच त्याला संघात प्रवेश दिला जाणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
A big thank you for your article.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.