आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ युएईला जाणार आहेत. पण युएईला जाण्यापूर्वी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स हा संघ एक कॅम्प घेणार आहे. या कॅम्पमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह बरेच खेळाडू असणार आहेत. पण चेन्नईमधील रवींद्र जडेजा मात्र या कॅम्पमध्ये नसेल, अशी माहिती आता मिळाली आहे. त्यामुळे जडेजा आता चेन्नईकडून खेळणार की नाही, याबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाचे आज कर्णधार महेंद्रसिंग धोनीची करोना चाचणी केली आहे, त्याचा अहवाल लवकरच पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सने अन्य काही खेळाडूंचीही करोना चाचणी केलेली आहे. खेळाडूंचा करोना चाचण्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यावर त्यांच्यासाठी एक कॅम्प चेन्नईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कॅम्पमध्ये धोनीसह हरभजन सिंग, लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह काही खेळाडू असणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्सच्या या कॅम्पमध्ये आयपीएलबाबत रणनिती ठरवली जाणार आहे. त्यामुळे यावेळी जेवढे जास्त खेळाडू या कॅम्पमध्ये सहभागी होतील, तेवढे संघासाठी चांगले असल्याचे म्हटले जात आहे. पण जडेजाना मात्र आपण या कॅम्पला उपस्थित राहू शकत नाही, असे सांगितले आहे.

जडेजाने यावेळी आपले वैयक्तिक काम असल्यामुळे आपल्याला चेन्नई सुपर किंग्सच्या कॅम्पला उपस्थित राहता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जडेजा थेट २१ ऑगस्टला संघाबरोबर युएईला जाणार आहे. पण त्यापूर्वी जडेजाला आपली करोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्याचा करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच त्याला संघाबरोबर युएईला जाता येणार आहे.

धोनीच्या करोना चाचणीसाठीचे सॅपल बुधवारी घेण्यात आले. रांचीतील गुरूनानक रुग्णालयात मेडिकल टीमने घरी येऊन त्याचे सॅपल घेतले. आता त्याच्या चाचणीचे रिपोर्ट आज (गुरुवारी )येणार आहेत. युएईला जाण्याआधी चेन्नई संघाचा एक कॅम्प होणार आहे. कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी करोना रिपोर्ट नेगेटिव्ह येण्याची गरज आहे. त्यानंतर धोनी १४ ऑगस्ट रोजी चेन्नईसाठी रवाना होईल. त्यानंतर तो चेन्नईच्या कॅम्पमध्ये सराव करणार आहे.

कालच राजस्थान रॉयल्स संघाचे फिल्डिंग कोचची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचे फिल्डिंग कोच दिशांत याग्निक यांना करोनाची लागण झाली आहे. १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आयपीएल साठी सर्व संघ तयारी करत असताना राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to ทิชชู่เปียกแอลกอฮอล์ Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here