चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता दोन महान खेळाडूंना एकाच संघातून खेळताना पाहण्याची संधी आता चाहत्यांना मिळणार आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे दोन महान खेळाडू आहेत तरी कोण आणि हे घडणार तरी कसं, पाहा…

वाचा-

लीगमध्ये आतापर्यंत दोन महान खेळाडू काही दिवसांपूर्वी एकत्र खेळत असल्याचे आपण पाहिले होते. पण गेल्या काही काळात दोन महान खेळाडू एकाच संघात पाहिले गेले नव्हते. पण या हंगामात मात्र रोनाल्डो आणि मेस्सी हे एकाच संघातून खेळणार असल्याचे आता समजत आहे.

रोनाल्डो आणि मेस्सी यांना एकाच संघातून खेळताना पाहण्याचा योग आता येणार असल्याचे समजते आहे. रोनाल्डो आणि मेस्सी हे बघायला गेले तर प्रतिस्पर्धी खेळाडू. या दोघांमध्ये बऱ्याचदा टशन बघितली गेली आहे. पण हे दोघे जेव्हा एकाच संघातून खेळतील तेव्हा नेमकी परिस्थिती कशी असेल आणि संघाची कामगिरी कशी होईल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

हे नेमकं घडणार तरी कसं…सध्याच्या घडीला रोनाल्डो हा जुवेंट्स या क्लबकडून खेळताना पाहायला मिळत आहे. पण आता जुवेंट्स हा संघ रोनाल्डोला यापुढे संधी देणार नसल्याचे समजत आहे. त्यामुळे आता रोनाल्डोला बऱ्याच संघाच्या ऑफर्स येत आहेत. जुवेंट्सपूर्वी रोनाल्डो हा रियल माद्रिद या संघाकडून खेळत होता. या संघाकडून तो ९ वर्षे खेळला होता. पण त्यानंतर जुवेंट्सने त्याला मोठी ऑफर दिली आणि रोनाल्डोने रियल माद्रिद संघाला सोडचिठ्ठी दिली होती.

वाचा-

माद्रिदच्या संघानंतर रोनाल्डो जुवेंट्सकडून खेळत होता. पण आता जुवेंट्सने रोनाल्डोला यापुढे संधी न देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रोनाल्डोला आता जुवेंट्स हा क्लब सोडावा लागणार आहे. रोनाल्डोला आता बार्सिलोना या दिग्गज क्लबने ऑफर दिल्याचे समजत आहे. या संघामध्ये मेस्सीही आहे. त्यामुळे रोनाल्डोने जर बार्सिलोनाची ऑफर स्वीकारली तर तो आणि मेस्सी एकाच संघातून खेळू शकतात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here