नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गेल्या एक वर्षापासून क्रिकेट खेळला नाही. चाहत्यांना उत्सुकता आहे की धोनी कधी एकदा मैदानावर खेळताना दिसेल. धोनीने गेल्या वर्षी वर्ल्ड कपमधील सेमीफायनल सामन्यानंतर ब्रेक घेतला होता. त्यानंतर तो आयपीएलमधून कमबॅक करणार होता. पण करोना व्हायरसमुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यामुळे धोनीला खेळताना पाहण्याचे स्वप्न लांबणीवर पडले. अखेर आता १९ सप्टेंबरला युएईमध्ये आयपीएलला सुरूवात होणार आहे.

वाचा-
वाचा-
विक्रम

आयपीएल खेळण्यासाठीचा पहिला अडथळा म्हणजे करोना चाचणी नेगेटिव्ह असने होय. यासाठी सर्व संघातील खेळाडू आणि अन्य सपोर्ट स्टाफची चाचणी सुरू झाली आहे. काल रांचीतील गुरूनानक रुग्णालयात मेडिकल टीमने घरी येऊन त्याचे सॅपल घेतले होते. आज काही वेळापूर्वी धोनीच्या करोना चाचणीचे रिपोर्ट आले आहेत.

वाचा-
धोनीच्या करोना चाचणीचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला असून यामुळे चाहत्यांना आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण जर धोनीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असता तर त्याला आयपीएल खेळता आले नसते आणि त्याच बरोबर भारतीय संघात पुन्हा प्रवेश करण्याची संधी ही त्याला मिळाली नसती. एक प्रकारे धोनीचे करिअर संपले असते.

वाचा-
आता धोनी उद्या चार्टर्ड विमानाने चेन्नईला जाणार आहे. आयपीएलचे सामने खेळण्याआधी सीएसकेचा कॅम्प चैन्नईत होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने आतापर्यंत ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे.

कालच राजस्थान रॉयल्स संघाचे फिल्डिंग कोच दिशांत याग्निक यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आयपीएलच्या १३व्या हंगामातील सदस्यांपैकी करोना पॉझिटिव्ह झालेले दिशांत याग्निक हे पहिले व्यक्ती ठरले होते. आयपीएलमधील सर्व संघाना काळजी लागली आहे ती त्यांचे खेळाडू करोनापासून दूर असावेत. एखादा महत्त्वाचा खेळाडू संघा बाहेर झाला तर संघाचे स्पर्धेतील कामगिरी बिघडू शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here