आतापर्यंत आयपीएल ही भारतामध्ये सर्वाधिक वेळा खेळवली गेली. पण यावेळी आयपीएल ही युएईमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे युएईतील सरकारच्या नियमांनुसार आता बीसीसीआयला काम करावे लागणार आहे. यापूर्वी आयपीएलचे प्रक्षेपण जी कंपनी करायची, तीच यावर्षी करणार की युएईमधील सरकारच्या नियमानुसार यामध्ये काही बदल झालेला आहे, पाहा…
यावर्षी आयपीएलचे सामने स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर प्रक्षेपित होणाार आहेत. कारण बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्स यांच्यामध्ये तसा करार झालेला आहे. त्यामुळे या करारात कोणीही बदल करू शकत नाही. त्याचबरोबर आयपीएलचे सामने हॉटस्टारवरही पाहायला मिळू शकतात. यावर्षी जिओ टीव्हीवर आयपीएलचे लाईव्ह सामने पाहायला मिळतील, असे वाटत होते. यासाठी जिओ आणि हॉटस्टार यांच्यामध्ये करार होणार होता. पण हा करार अजूनही झालेला नाही. पण हा करार लवकरच होऊदेखील शकतो, असेही म्हटले जात आहे.
वर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे. पण आतापर्यंत युएईमध्ये एकही आयपीएलमधील संघ पोहोचू शकलेला नाही. सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणार असून त्यानंतर त्यांना युएईला पाठवण्यात येणार आहे. यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये रंगणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने दुबई, आबुधाबी आणि शारजा या तीन ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.
गेल्यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी केली होती. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सनेच जेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावर्षी पहिला सामना खेळण्याचा मान त्यांचाच असेल. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होईल, असे म्हटले जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ७.३० वाजता सुरु होणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.