अहमदाबाद : शुभमन गिलने सोमवारी आयपीएलमधील पहिले शतक केले. ही कामगिरी करताना तो यंदा कसोटी, वनडे, टी-२० तसेच आयपीएलमध्ये शतक केलेला एकमेव फलंदाज ठरला आहे. गुजरात टायटन्स-सनरायजर्स हैदराबाद या लढतीत गिलची शतकी खेळी सोडल्यास १८२ चेंडूत २१९ धावा होताना १७ फलंदाज बाद झाले.

गिलने ५८ चेंडूंत १०१ धावा केल्या होत्या. त्यामुळे गुजरातने ५४ धावांनी विजय मिळवला होता. त्याने२०२३ च्या पहिल्या पाच महिन्यात आता सहा शतके केली आहेत. त्यातील दोन शतके अहमदाबादला आहेत.

त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे लढतीत ११६ धावा केल्या. हाच धडाका कायम राखत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे लढतीत द्विशतकी खेळी केली होती. त्यावेळी त्याने १४९ चेंडूंत २०८ धावांचा चोप दिला होता. हैदराबादच्या या खेळीनंतर त्याने इंदूरला ११२ धावा केल्या.

अहमदाबादला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० लढतीत १२६धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर त्याने अहमदाबादलाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत १२८ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये सोमवारच्या सामन्यापूर्वी त्याने १२ सामन्यात चार अर्धशतके केली होती. आता शतकही केले आहे.
Monsoon Delayed : मान्सूनचं आगमन लांबणार, केरळमध्ये ‘या’ दिवशी धडकणार, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

गिलच्या शतकाचे महत्त्व

– गिलच्या गुजरात संघातील आठ फलंदाजांच्या एकेरी धावा

– २२ चेंडूंत पन्नास धावा केल्यावरही केवळ एकच षटकार

– एक किंवा एकही षटकार नसतानाही शतक, हे आयपीएलमध्ये केवळ तिसऱ्यांदा

– चौकार मारतानाही गिलने कोणताही धोका पत्करला नव्हता.

– तेरापैकी एकच चौकाराच्यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारला होता

– खेळपट्टी मध्यमगती गोलंदाजांना अनुकुल

– चेंडू टप्पा पडल्यावर काहीसा थांबत होता तसेच अपेक्षेपेक्षा जास्त स्विंग

– दोन्ही डावाच्या सुरुवातीस स्लीपमध्ये दोन क्षेत्ररक्षक
Devendra Fadnavis: कर्नाटकच्या प्रचारात दगदग झाल्याने फडणवीसांची प्रकृती बिघडली; सक्तीच्या विश्रांतीवर

दरम्यान, शुभमन गिलचे तडाखेबंद शतक आणि महंमद शमी, मोहित शर्मा यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने सोमवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघावर ३४ धावांनी विजय नोंदवला. यासह गुजरात टायटन्सने ‘प्ले-ऑफ’च्या ‘क्वालिफायर-१’मधील स्थानही निश्चित केले. क्वालिफायरमध्ये प्रवेश करणारा गुजरात पहिला संघ ठरला होता.

Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम; खुर्ची कुणाची? निर्णय होईना

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here