नवी दिल्ली: भारताच्या सचिन तेंडुलकरला गॉड ऑफ क्रिकेट असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर शतकांचे शतक आहे. या ऐतिहासिक प्रवासाची सुरूवात १४ ऑगस्ट रोजी झाली होती. सचिनने इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टर येथे पहिले शतक केले होते. ३० वर्षापूर्वी सचिनने मॅनचेस्टरमध्ये झळकावलेले पहिले शतक हे त्याच्या १०० शतकाच्या प्रवासातील पहिले आणि महत्त्वाचे होते. पण या शतकाचा पाया पाकिस्तानमधील सियालकोट येथे तयार झाला होता. कसा तो जाणून घ्या…

सचिनच्या १०० शतकातील पहिले शतक १४ ऑगस्ट १९९० रोजी झळकावले गेले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी त्यानेन नाबाद ११९ धावा केल्या आणि टीम इंडियाला पराभवापासून वाचवले. सचिनच्या या पहिल्या शतकाला आज ३० वर्ष पूर्ण झाली.

मी १४ ऑगस्ट रोजी शतक केले आणि दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता त्यामुळे हे शतक खास ठरले. वृत्तपत्रातील हेडलाइन वेगळ्या होत्या. त्या शतकाने मालिकेत आमचे अस्तित्व टिकून राहिले, असे सचिन म्हणाला.

एखादा कसोटी सामना वाचवण्याचे माझे कौशल्य नवे होते. पण याची तयारी वकार युनूसचा बाउंसर चेंडू लागल्यानंतर नाकातून रक्त आल्यानंतर देखील फलंदाजी केली तेव्हा झाली होती. सियालकोट येथे जखमी झाल्यानंतर देखील मी ५७ धावा केल्या. आम्ही तो सामना वाचवला तोही असा परिस्थितीत जेव्हा ३८ धावांवर चार विकेट पडल्या होत्या. वकारचा बाउंसर आणि ती वेदना मला ताकद देऊन गेली.

आचरेकरांनी दिली होती कमालीचे ट्रेनिंग
मॅनचेस्टर कसोटीत डेवोन मॅक्लम यांनी सचिन तेंडुलकरला तशाच प्रकारची वेगवान गोलंदाजी केली होती. तेव्हा डेवोन आणि वकार हे जलद गोलंदाजी करत. चेंडू लागल्यानंतर मी फिजिओला बोलवले नाही. मला वेदना व्हावी असे वाटत होते. पण अशी परिस्थितीत खेळण्याची सवय होती. आचरेसर सर आम्हाला एकाच पिचवर २५ दिवस फलंदाजी करायला लावत. अशा पिचवर चेंडू उसळी घेत अंगावर येत असे, असे सचिनने सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अखेरच्या तासात वाटले आम्ही सामना वाचवू शकू असे वाटले नाही. १८३ धावांवर ६ विकेट पडल्या होत्या. मी आणि मनोज प्रभाकर एकमेकांना सांगत होतो की आपण मॅच वाचवू शकतो. सामना वाचवल्यानंतर मला सामनावीर पुरस्कारासोबत एक शॅपेन मिळाली. मी फक्त १७ वर्षाचा होता आणि ड्रींक घेत नसे, अशी आठवण सचिनने सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here