नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटमध्ये सात हजार धावा आणि १०० ची सरासरी गाठण्यासाठी यांना फक्त ४ धावांची गरज होती. पण अखेरच्या कसोटीत ते दुसऱ्या चेंडूवर बोल्ड झाले. ऑस्ट्रेलियाने हा सामना एका डावाच्या अंतराने जिंकला आणि त्यामुळे ब्रॅडमन यांना पुन्हा फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. जाणून घेऊयात क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अनलकी झिरोबद्दल…

वाचा-
१९४८ साली झालेली अॅशेस मालिकेला खास असे महत्त्व होते. ओव्हर मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एका डावाने पराभव केला. पण हा विजय जगातील सर्वोत्तम फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यासाठी अनलकी ठरली. या सामन्यात ते दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले. यामुळे ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी गाठता आली नाही. ब्रॅडमन यांना या गोलंदाजाने बाद केले.

काय झाले होते त्या सामन्यात
ऑस्ट्रेलियाचा संघ १९४८ साली पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आला होता. मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानावर झाला. या सामन्यात सर्वांची नजर होती ब्रॅडमन यांच्यावर, कारण १००ची सरासरी गाठण्यासाठी त्यांना ४ धावांची गरज होती. १४ ऑगस्ट १९४८ रोजी पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव ५२ धावांवर गुंडाळण्यात आला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागिदारी करत धमाकेदार सुरुवात केली. पण त्यानंतर जे झाले ते धक्कादायक होते.

वाचा-
ब्रॅडमन खेळण्यास आले आणि चेंडू होता एरिक होलीज यांच्याकडे… असे गोलंदाज ज्यांच्याकडे कसोटी क्रिकेटचा अनुभव नव्हता. एरिक यांचा पहिला चेंडू ब्रॅडमन यांनी सिली मिड ऑफला खेळला. दुसरा चेंडू एरिक यांनी गुगली टाकला जो ब्रॅडमन यांना समजला नाही आणि तो बोल्ड झाले. एरिक यांच्या या दोन चेंडूनी ब्रॅडमन यांच्या क्रिकेट करिअरचा शेवट झाला.

इंग्लंडने ही कसोटी एका डावाने गमावली. ब्रॅडमन यांना दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर त्यांना ५२ कसोटीत ९९.९४च्या सरासरीने धावा करता आल्या. इतक नव्हे तर त्यांना ७ हजार धावा पूर्ण करता आल्या नाही. यात २९ शतक, १३ अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी १२ वेळा द्विशतकी खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील द्विशतकाचा हा विक्रम आज देखील कायम आहे.

पाहा ब्रॅडमन यांनी खेळलेले अखेरच्या दोन चेंडूचा व्हिडिओ-

एरिक होलीज यांनी १३ कसोटी सामन्यात ४४ विकेट घेतल्या. प्रथम श्रेणीचा विचार केल्यास त्यांनी २५ वर्षात ५१५ सामन्यात २ हजार ३२३ विकेट घेतल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here