गेल्याच आठवड्यात भारतीय हॉकी संघातील ६ खेळाडूंना करोना झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचे फिल्डिंग कोच यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता हैदराबाद येथे सुरु असलेल्या नॅशनल कॅपमध्ये सहभागी होण्यास आलेल्या एन सिक्की रोड्डीला करोना व्हायरसची लागण झाली आहे. सिक्कीच्या फिजिओथेरेपिस्ट किरण जॉर्ज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये करोनाचे कोणतेही लक्षण दिसले नव्हते. तरी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
वाचा-
एन सिक्की रोड्डी आणि किरण जॉर्ज यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या पीव्ही सिंधूला करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. सिक्की आणि किरण यांचे रिपोर्ट आल्यानंतर बॅडमिंटन कॅम्पला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने बंद केले आहे. हा कॅम्प पुलेला गोपीचंद यांची बॅडमिंटन अकादीमी घेत आहे. आता या अकादमीला सॅनिटायझेशन करून बंद करण्यात आले आहे.
वाचा-
भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना कोरनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दोघी ही हैदराबादच्या आहेत आणि घरातून थेट कॅम्पमध्ये आल्या होत्या. या दोघी कोणाच्या संपर्कात आल्या होत्या याची माहिती घेतली जात आहे.
वाचा-
कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाड, प्रशिक्षक, स्टाफ आणि अधिकाऱ्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे गोपीचंद म्हणाले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times