युएईमध्ये १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ आदींची करोना चाचणी घेतली जात आहे. त्यानंतर संघांचे सर्वा सत्र होती आणि मग सर्व जण युएईला जातील. आतापर्यंत झालेल्या चाचणीत फक्त राजस्थान रॉयल्स संघाच्या फिल्डिंग कोचला करोना झाल्याचे समोर आले.
वाचा-
युएईमध्ये स्पर्धेसाठी जैव वातावरण तयार करून करोनाला आयपीएल पासून दूर ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. यासाठी बीसीसीआयने SOP तयार केला आहे.
जर खेळाडूला करोना झाला तर स्पर्धा रद्द होणार?
आयपीएलच्या sop ड्राफ्टनुसार जर एखाद्या खेळाडूची करोना चाचणी जर स्पर्धा सुरू असताना पॉझिटीव्ह आली तर त्या खेळाडूमुळे संपूर्ण स्पर्धा रद्द किंवा स्थगित होणार नाही. एक किंवा दोन खेळाडूंना करोनाची लक्षणे दिसली तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यानंतर दोन आठवड्यांनी २४ तासात दोन करोना टेस्ट घेतली जाईल. या दोन्ही चाचणी नोगेटिव्ह आल्या तरच संबंधित खेळाडू पुन्हा स्पर्धेत खेळू शकेल.
वाचा-
तसेच करोनाची काही लक्षणे आढळल्यास जैव वातावरणतून संबंधित खेळाडूला दोन आठवडे बाहेर जावे लागेल. त्यानंतर कार्डियाक स्क्रीनिंग केल्यानंतर तो पुन्हा जैव वातावरणात परतू शकेल.
सहा वेळा होणार करोना चाचणी
बीसीसीआयने आयपीएलसाठी तयार केलेल्या sopनुसार २० ऑगस्टनंतर संघ युएईला जाण्यास तयार होतील. २३ तारखेपर्यंत त्यांना युएईमध्ये पोहोचावे लागले. अधिक तर विदेशी खेळाडू थेट युएईमध्ये संघाशी जोडले जाणार आहेत.
वाचा-
सर्व खेळाडू, स्टाफ यांची विमानतळावर करोना चाचणी होईल. त्यानंतर हॉटेलवर त्यांना सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागले. या सात दिवसात ३ वेळा करोना चाचणी होईल. एकूण प्रत्येकाला ६ वेळा चाचणी द्यावी लागणार आहे. या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर जैव वातावरणात जाण्याची परवानगी दिली जाईल.
आयपीएलसाठी हॉटेल, स्टेडियम, सर्वा सत्राचे ठिकाणी येथे जैव वातावरण असेल. स्पर्धा संपेपर्यंत कोणालाही या वातावरणाच्या बाहेर जाता येणार नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times