हैदराबाद: आयपीएलचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. जसजसा प्लेऑफ जवळ येत आहे. तसतसा हा माहोल अधिक रंजक होत आहे. प्रत्येक सामन्यानंतर प्लऑफचं समीकरण बदलत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी एक अप्रतिम सामना खेळला गेला. घरचा संघ सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात धावांचा डोंगर पाहायला मिळाला. दोन्ही संघातील दमदार फलंदाजांनी या सामन्यात शतके झळकावली.चेसमास्टर विराट कोहलीने हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले आणि बंगळुरूला ८ विकेटने विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्याचवेळी विराटला सामन्यानंतर मैदानातच पत्नीला अनुष्का शर्माची आठवण आली आणि तिच्यासोबत तो व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसला, ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ कॉल
भारतीय क्रिकेट संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट हैदराबादविरुद्ध चांगलीच तळपली. त्याच्या शतकाने हैदराबादमध्ये पुन्हा एकदा त्याचा जलवा पाहायला मिळाला. पण शतक झळकावल्यानंतर आणि सामना संपल्यानंतर विराट बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत व्हिडिओ कॉल करताना दिसला, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विराटने मैदानावरूनच अनुष्काला व्हिडिओ कॉल केला होता. कॉलवर दोघेही खूप खुश दिसत होते. इतकेच नाही तर अनुष्काने शतक झळकावल्यानंतर विराटसाठी तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये ती कोहलीला ‘फटाका’ म्हणताना दिसली.

विराट कोहलीचे आयपीएलमध्ये सहावे शतक
विराट कोहलीने १८ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याने ६३ चेंडूत १०० धावांची जबरदस्त खेळी केली. कोहलीने १५८.७३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना या डावात १२ चौकार आणि ४ षटकार मारले. कोहलीसाठी आयपीएलचा हा मोसम सुवर्ण स्वप्नापेक्षा कमी नाही. यंदाच्या मोसमात मध्यावर कोहलीचा फॉर्म हरवतो आहे असे वाटत होते. पण या चर्चांवर त्याने या शतकी खेळीने पूर्णविराम लगावला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More