आयपीएलपूर्वी सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. खेळाडू जर चाचणीमध्ये निगेटीव्ह आले तरच त्यांना आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये पाठवण्यात येणार आहे. पण युएईमध्ये पोहोचल्यावर खेळाडूंना थेट सराव करता येणार नाही. कारण खेळाडूंना काही दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. युएईच्या नियमांनुसार खेळाडूंना किती दिवस क्वारंटाइन राहावे लागेल, ते पाहा…

आयपीएलसाठी आता युएई सरकारचे नियम खेळाडूंना पाळावे लागणार आहे. त्यामुळे भारतामध्ये जरी खेळाडू करोना निगेटीव्ह आले तरी त्यांना युएईमध्ये गेल्यावर थेट सराव करता येणार नाही. त्यांना सुरुवातीला क्वारंटाइन व्हावे लागेल. त्यानंतर खेळाडूंची करोना चाचणी होणार आहे. या करोना चाचणीमध्ये खेळाडू निगेटीव्ह आल्यावरच त्यांना सराव करता येणार आहे. पण खेळाडूंना किती दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल, पाहा…

खेळाडूंना किती दिवस क्वारंटाइन व्हावे लागणारसध्याच्या घडीला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यावर १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागते. पण युएईमध्ये नियम थोडे वेगळे आहेत. भारतीय खेळाडू युएईमध्ये पोहोचल्यावर त्यांना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांची करोना चाचणी होईल आणि त्यामध्ये जर ते निगेटीव्ह सापडले तर त्यांना सराव करता येणार आहे.

आयपीएलमध्ये खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला तर काय करणार…युएईमध्ये आयपीएल खेळत असताना जर एखाद्या खेळाडूला करोना झाला तर स्पर्धा रद्द होणार नाही. पण यासाठी काही नवीन नियम बनवण्यात आले आहे. काय आहेत हे नियम, जाणून घेऊया… युएईमध्ये आयपीएल खेळत असताना जर खेळाडूंना करोना झाला तर स्पर्धा रद्द करण्यात येईल, असे म्हटले जात होते. पण या गोष्टीवर आता स्पष्टीकरण आलेले आहे. जर आयपीएल खेळताना खेळाडूला करोना झाला तर त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल. दोन आठवडे खेळाडूला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल, त्यानंतर २४ तासांमध्ये खेळाडूच्या दोन करोना चाचण्या होतील. त्यामध्ये खेळाडू जर निगेटीव्ह सापडला तर त्याला आयपीएल खेळता येईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here