हेलिकॉफ्टर शॉट मारायला भरपूर ताकद लागते. कारण जेव्हा चेंडू यॉर्कच्या लाईनमध्ये असतो तेव्हा त्या चेंडूंला फटकावण्यासाठी सर्वात जास्त ताकद लागते. पायाखाली आलेला चेंडू हवेत भिरकावण्यासाठी ताकद, टायमिंग यांचा उत्तम संगम होणे गरजचे आहे. प्रत्येकालाच ही गोष्ट जमत नाही. क्रिकेट विश्वात बऱ्याच जणांनी हा हेलिकॉफ्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना धोनीसारखा हेलिकॉफ्टर शॉट मारता आला नाही. पण सात वर्षांच्या मुलीने कसा काय धोनीसारखा हेलिकॉफ्टर शॉट मारला आहे, तुम्हीच पाहा…
भारताचा माजी सलामीवीर आणि समाचोलक आकाश चोप्राने हा व्हिडीओ आता शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आकाशने समालोचनही केले आहे. त्याचबरोबर बी सात वर्षांची मुलगी कशी चांगले क्रिकेट खेळत आहे, हेदेखील त्याने सांगितले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीदेखील हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओबाबत मांजरेकर काय म्हणाले, पाहा…
मांजरेकर यांनी म्हटले आहे की, ” हेलिकॉफ्टर शॉटचा सराव नेमका कसा केला जातो, हे मी पाहिले आहे. धोनी हा चांगले यष्टीरक्षण तर करतच होता. स्टम्पजवळ उभा राहून त्याचे यष्टीरक्षण करणे सुरेख होते. त्याचबरोबर धोनीचा हेलिकॉफ्टर शॉट हा युवा क्रिकेटपटूंमध्ये चांगलाच प्रसिद्ध झालेला आहे.”
सर्वात पहिल्यांदा या सात वर्षांच्या मुलीचा हेलिकॉफ्टर शॉट सर्वांना दाखवला होता तो इंग्लंडचे माजी कर्णधार आणि समाचोलक नासीर हुसेन यांनी. हुसेन यांनी पहिल्यांदा या मुलीचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर इंग्लंडच्या काही खेळाडूंनी हा व्हिडीओ पाहिला आणि या मुलीचे कौतुकही केले होते.
ही सात वर्षांची मुलगी हरियाणामधील असून तिचे नाव परी शर्मा आहे. परीला भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करायचे आहे, त्याचबरोबर तिला सर्व फलंदाजांचे विक्रमही मोडायचे आहेत. परीला तिचे वडिल प्रशिक्षण देत आहेत. परीचे वडिल जोगिंदर शर्मा आणि अजय रात्रा या दोघांबरोबर क्रिकेट खेळलेले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.