धर्मशाला: आयपीएल २०२३ च्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात, राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. या पराभवासह पंजाब किंग्जच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. सॅम करनच्या नाबाद ४९ धावांच्या खेळीशिवाय पंजाब किंग्जने पाचव्या विकेटसाठी जितेश शर्मा (४४) सोबत ६४ धावांची भागीदारी आणि सहाव्या विकेटसाठी शाहरुख खानसह ३७ चेंडूत ७३ धावांच्या शानदार भागीदारीच्या जोरावर १८७ धावा केल्या. राजस्थानने शेवटच्या षटकात ६ विकेट गमावत लक्ष्य गाठले.राजस्थानचे १४ सामन्यांत १४ गुण आहेत, परंतु आरसीबी आणि मुंबईने त्यांचे शेवटचे सामने मोठ्या फरकाने जिंकले तरच त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचेही प्रत्येकी १४ गुण आहेत. पण दोघांचे १-१ सामने बाकी आहेत. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तर हैदराबाद, दिल्ली आणि पंजाबचा प्रवास संपला आहे. कोलकाताचा संघ शर्यतीत असेल पण त्यांचा नेट रनरेट खराब आहे आणि त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

राजस्थान रॉयल्सच्या या विजयाने राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला असून मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर गेला आहे. आरसीबी, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सचे प्रत्येकी १४ गुण आहेत. तर सातव्या क्रमांकावर कोलकाताचा संघ १२ गुणांवर आहे.

IPL 2023 Points Table

लीगमध्ये चार सामने बाकी

आता आयपीएल २०२३ मध्ये फक्त चार गट सामने शिल्लक आहेत. आज दिवसाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दुसऱ्या सामन्यात केकेआरचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. रविवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादनंतर आरसीबी आणि गुजरात यांच्यात सामना होणार आहे.

मुंबई प्लेऑफ पोहोचणार?

१४ गुणांसह मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट सर्वात वाईट आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. यामुळे लखनौ, चेन्नई आणि आरसीबी यापैकी कोणताही एक संघ आपला सामना गमावेल अशी अपेक्षा करावी लागेल. यानंतरच मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळेल.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here