IPL 2023 DC vs CSK Danny Morrison Troubled By Chant Of Dhoni-Dhoni Watch What Happened During Toss : DC vs CSK: इशाऱ्याने संवाद करण्याची वेळ आली; टॉसच्या वेळी नेमका काय गोंधळ झाला, Video
नवी दिल्ली: आयपीएल २०२३ मध्ये आज शनिवारी डबल हेडरमधील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. ही लढत दिल्लीत होत असली तरी अरुण जेटली मैदानावर चेन्नईच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. धोनीला पाहण्यासाठी संपूर्ण स्टेडियमध्ये यलो जर्सी दिसत आहे. दिल्लीचा संघ याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तर चेन्नईसाठी ही लढत जिंकणे गरजेचे आहे.मॅच सुरू होण्याआधी टॉसच्या वेळी अशी एक घटना घडली ज्याची चर्चा आता सुरू झाली आहे. टॉस दरम्यान डॅनी मॉरिस यांनी हिंदीत आराम से आराम असे म्हणून सुरुवात केली. टॉससाठी नाणे हवेत उचलले आणि धोनीने टॉस जिंकला. या घटनेवेळी स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांनी धोनी-धोनी अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे मॉरिसन यांना काही ऐकू येत नव्हते. अखेर त्यांनी इशाऱ्यानेच धोनीला विचारले फलंदाजी करणार की गोलंदाजी, यावर धोनीने देखील हाताने इशारा करत फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. इशारा करत असताना धोनीच्या चेहऱ्यावर हसू आले.
टॉस झाल्यावर धोनीने सांगितले की, आम्ही प्रथम फलंदाजी करू. पहिल्या सामन्यापासून आमचा मॅच जिंकण्याचा प्रयत्न आहे. संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची गरज नाही. दिवसाचा खेळ असल्यामुळे पिच नंतर धीमी होईल. त्यामुळेच फलंदाजीचा निर्णय घेतला. संघातील युवा खेळाडूंना यातून शिकण्यास मिळेल.