यावर्षी आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे आणि सर्वच खेळाडू आयपएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुत असल्याचे म्हटले जात आहे. पण यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात सात संघांना मोठे नुसकान होणार असल्याची एक गोष्ट पुढे आली आहे. या सात संघांना नेमके काय नुकसान होणार आहे, पाहा….

आयपीएल खेळण्यासाठी बीसीसीआयने चांगलीच कंबर कसलेली आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील संघ मालकांनीही जोरदार तयारी केली आहे. खेळाडूंची करोना चाचणी आणि त्यांना क्वारंटाइन करण्याबाबत आता संघ मालकांनी महत्वाची पावले उचलली आहे. पण तरीही आयपीएलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सात संघांना नुकसान होणार असल्याचे समजते आहे.

आयपीएल सुरु झाल्यावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये क्रिकेट मालिका रंगणार आहे. ही मालिका आयपीएलच्या पहिल्या आठवड्यामध्येच होणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील सात संघांतील तब्बल २२ खेळाडू पहिल्या आठवड्यामध्ये खेळू शकणार नाहीत. त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात या सात संघांच्या कामगिरीवर परीणाम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

कोणत्या संघांतील खेळाडू खेळणार नाहीत, पाहा…सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टोव, मिचेल स्टॅनलेक.
चेन्नई सुपर किंग्स : शेन वॉटसन, सॅम कुरन, जोश हेझलवूड.
राजस्थान रॉयल्स : जोफ्रा आर्चर, जोस बटलर, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, टॉम कुरन अँण्ड्य्रू टाय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : मोईन अली, केन रिचर्डसन, आरोन फिंच, जे फिलीप.
किंग्लस इलेव्हन पंजाब: ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस जॉर्डन.
कोलकाता नाइट रायडर्स : इऑन मॉर्गन, टी. बॅटन, पॅट कमिन्स, गर्नी.
दिल्ली कॅपिटल्स: अॅलेक्स करी, जेसन रॉय, मार्कस स्टॉयनिस.
मुंबई इंडियन्स: ख्रिस लीन, नॅथन कल्टर नाईल.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने ४ सप्टेंबरला सुरु होतील आणि १६ सप्टेंबरपर्यंत सुरु राहतील. त्यानंतर या दोन्ही देशांतील खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी युएईला पोहोचतील. पण त्यानंतर त्यांना पहिल्यांदा क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल आणि करोना चाचणी निगेटीव्ह आल्यावरच त्यांना आयपीएल खेळता येणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here