कोलकाता: लखनऊ सुपरजायंट्सने आयपीएल २०२३ मधील त्यांच्या शेवटच्या ग्रूप सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (LSG Vs KKR) ला एका धावेने पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. रिंकू सिंगच्या धडाकेबाज खेळीने केकेआरला लक्ष्याच्या अगदी जवळ नेले. पण त्याला समोरच्या फलंदाजाची साथ मिळू शकली नाही. रिंकूने ३३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा केल्या. लखनऊ प्रथम खेळताना १७६ धावा केल्या होत्या. केकेआरचा संघ १७५ वर येऊन थांबला.अखेरच्या दोन षटकांत संघाला विजयासाठी ४१ धावांची गरज होती, मात्र रिंकूच्या आक्रमक खेळीनंतरही संघ विजयापासून एक धाव लांब राहिला. १९ व्या षटकात त्याने नवीन-उल-हकविरुद्ध २० धावा ठोकल्या. अखेरच्या षटकात यश ठाकूरविरुद्ध त्याने १९ धावा केल्या आणि केकेआर सामना गमावला. केकेआरच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूही दु:खी झाले आहेत. कारण, आता या दोन संघांपैकी एकच संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार आहे.

एक नो बॉल ठरला गेमचेंजर, विराटच्या साथीनं डु प्लेसिस बनला गोलंदाजांचा कर्दनकाळ, हैदराबादची धुळदाण
शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वैभव अरोराकडे स्ट्राइक होती. त्याने सिंगल घेऊन रिंकूला स्ट्राइक दिली. पण, दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही. त्याने ओव्हरचा तिसरा चेंडू लाँग ऑन आणि डीप मिड विकेटमध्ये खेळला. चेंडू खेळाडूपासून खूप लांब होता. येथे त्याला दोन धावा घेण्याची संधी होती पण रिंकू धावलाच नाही.

वैभव धावबाद झाला असता तरी केकेआरला एक धाव मिळाली असती. अशा परिस्थितीत सामना सुपर ओव्हरपर्यंत जाऊ शकला असता. पण, असं होऊ शकलं नाही. दुसरीकडे हे देखील तितकंच खरं आहे की जर रिंकूच्या जागी दुसरा कोणी फलंदाज असता तर कदाचित केकेआरच्या पराभवाचे अंतर खूप जास्त असते.

पर्पल कॅपचा मानकरी, मैदानावर उतरला की फलंदाजांना घाम फुटायचा, सुपर ओव्हर चॅम्पियन आज संघाबाहेर
रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे टीम इंडियामध्ये त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. संघाला टी-२० मध्ये ५ किंवा ६ व्या क्रमांकावर असा फलंदाज मिळाला आहे, जो कोणत्याही परिस्थितीत सामना फिरवू शकतो.

धोनीची एक झलक पाहण्यासाठी दिल्लीत गर्दी, व्हिडिओ व्हायरल

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here