आयसीसीनं बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याची एका स्थानानं घसरण झाली आहे. तर रहाणेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. पुजारा हा सहाव्या स्थानी असून, रहाणे नवव्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ७७२ गुणांसह नवव्या आणि मोहम्मद शामी हा ७७१ गुणांसह दहाव्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशाने यानं क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. २५ वर्षीय मार्नसनं न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात २१५ आणि ५९ धावांची खेळी केली होती. अलीकडेच झालेल्या या मालिकेत त्यानं सर्वाधिक ५४९ धावा केल्या होत्या.
गोलंदाजांमध्ये कमिन्स अव्वल
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर नील वॅगनर हा ८५२ गुणांसह दुसऱ्या, तर वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर हा ८३० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मिशेल स्टार्क पाचव्या स्थानी आहे. फिरकीपटू नॅथन लायन १४ व्या स्थानी आहे.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News