MUMBAI INDIANS HAVE QUALIFIED FOR IPL 2023 PLAYOFFS : रोहित शर्माच्या मदतीला हार्दिक पांड्या धावून आलाय. अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत गुजरातला 198 धावांचे आव्हान दिले होते, गुजरातने हे आव्हान सहज पार केले. विराट कोहली याने वादळी शतकी खेळी करत आरसीबीच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण युवा शुभमन गिल आणि विजय शंकर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचा पराभव केला. गुजरातने या विजयासह 14 सामन्यात 20 गुणांची कमाई केली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात पराभव झाल्यामुळे आरसीबीचे आव्हान संपुष्टात आलेय. तर मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. आरसीबीचे 14 सामन्यात सात विजय आणि सात पराभव झाले आहेत. 

ग्रीनच्या शतकामुळे मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेश – 

मोक्याच्या सामन्यात कॅमरुन ग्रीन याने शतकी खेळी केली. कॅमरुन ग्रीन याचे शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने हैदराबादचा आठ विकेटने पराभव केला. वानखेडे मैदानावर मोक्याच्या सामन्यात मुंबईने हैदराबादवर विजय मिळवला.  हैदराबादने दिलेले 201 धावांचे आव्हान मुंबईने 12 चेंडू आणि 8 विकेट राखून सहज पार केले. या विजयामुळे मुंबईचे 16 गुण झाले.  

कधी कुठे होणार सामना ?

बुधवारी, 24 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर लखनौ आणि मुंबई यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल.  लखनौ संघ 17 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईचा संघ 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. मुंबईने 14 सामन्यात 16 गुणांची कमाई केली आहे.

IPL 2023, Qualifier 1 चेन्नई अन् गुजरातमध्ये लढत –

धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. गुजरातने सलग दुसऱ्यावर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर चेन्नईने आतापर्यंत सर्वाधिकवेळा क्वालिफाय मध्ये प्रवेश केलाय. मंगळवारी, 23 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालियाफाय 1 सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. चेन्नई घरच्या मैदानावर हार्दिक पांड्यासोबत दोन हात करणार आहे. यामधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.  क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ ELIMINATOR मधील विजेत्या संघासोबत क्वालिफायर 2 मध्ये सामना खेळेल. sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here