आयपीएलच्या प्रायोजकत्वसाठी आता पतंजली, जिओ पाठोपाठ भारताच्या टाटा सन्स ही कंपनीही आता शर्यतीत उतरली आहे. टाटा ही भारतातील सर्वात जुनी कंपनी आहे. त्याचबरोबर टाटा या कंपनीवर लोकांना दृढ विश्वास आहे, त्यामुळे बीसीसीआय त्यांना आयपीएलचे प्रायोजकत्व देऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

यावर्षी चीनच्या विवो या कंपनीने आयपीएलचे प्रायोजकत्व काढून घेतले आहे, त्यामुळे बीसीसीआयला मोठे नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे.
कारण विवो ही कंपनी दरवर्षी आयपीएलला ४४० कोटी रुपये देत होती. पण त्यांनी यावर्षी हा करार रद्द केला आहे. त्यामुळे बीसीसीआयला कमी कालावधीमध्ये प्रायोजकत्व मिळाले तरी त्यांना ४४० कोटी एवढी मोठी रक्कम मिळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे.

यापूर्वी आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीने पसंती दर्शवली होती. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या जिओ या कंपनीनेही आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी उत्सुकता दाखवली होती. त्याचबरोबर बायजू आणि अनअॅकॅडमी या कंपनींनीदेखील उत्सुकता दाखवली आहे. त्यामध्ये आज टाटा सन्स या कंपनीची भर पडली आहे.

वाचा-

आज आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी अर्ज करण्याची आज अखेरची तारीख होती. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी एकूण पाच निविदी आल्याचे पाहायला मिळाले आहे. कालपर्यंत टाटा कंपनीचे नाव आयपीएलच्या प्रायोजकत्वच्या शर्यतीमध्ये नव्हते. पण आज मात्र टाटा सन्स या कंपनीने आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी आपण उत्सुक असल्याचे दाखवले आहे.

वाचा-

टाटा सन्सला किती कोटी मोजावे लागणारयापूर्वी विवो ही कंपनी दरवर्षी आयपीएलला ४४० कोटी रुपये देत होती. पण आता एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी मोठी रक्कम आयपीएलला मिळू शकत नाही. त्यामुळे टाटा सन्स या कंपनीला सध्याच्या घडीला आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी २५०-३०० कोटी रुपये मोजावे लागू शकतात. त्याचबरोबर अन्य चार कंपन्या आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी किती रुपये मोजायला तयार आहेत, हेदेखील पाहावे लागणार आहे. आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी टाटा या कंपनीला पतंजली आणि जिओ या कंपनीकडून जोरदार टक्कर मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here