करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रथम राजघाटावर स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर नुकतंच ध्वजारोहण केलं. आज स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असतील यावर देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागले होते. दिल्लीतील या कार्यक्रमासाठी जवळपास ४००० लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.
भारताचा स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. विराट कोहलीने याबाबत एक ट्विट करत शहीद जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोहली म्हणाला की, ” देशवासियांना स्वातंत्रदिनाचा शुभेच्छा. आपले जे जवान देशाला सुरक्षित ठेवत आहेत, जे सीमेवर आहेत त्यांनी स्वत:ला सुरक्षित ठेवायला हवे.”
इरफानने स्वातंत्रदिनी देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केले आहे. हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये इरफान पठाण म्हणाला की, ” मेने ख्वाब में सोने की चिडीया को परवा चढते हुए देखा हैं, चिडीयाने दाने कहीं रंग के खाए हो, लेकीन उसके जिस्मपे रंग सिर्फ तिरंगाही दिखता हैं…” हे इरफानचे ट्विट सध्याच्या घडीला चांगलेच व्हायरल झाले असून देशवासियांनी इरफानचे कौतुकही केले आहे.
आज भारताच्या स्वातंत्रदिनी इरफान पठाणसह भारताच्या संघातील खेळाडूंनीही ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज नवी दिल्लीमधील लाल किल्ल्यावरून भाषण केले. “करोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत आहे. आपल्या आयुष्याची पर्वा न करता डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, संरक्षण व्यवस्था, अनेक लोक २४ तास काम करत आहेत,” असे मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times