रांची: भारताचा माजी कर्णधार याने निवृत्तीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट टाकून त्याने निवृत्तीची घोषणा केली. ही बातमी कळताच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे चकीत झाले. यानंतर सोरेन यांनी माहीसाठी रांची येथे निरोपाचा सामना (farewell match) खेळवण्याची मागणी केली. देशवासीयांचे मन अद्याप भरले नाही, असं सोरेन म्हणाले.

देशाला आणि झारखंडला कित्येकदा अभिमान आणि उत्साहाचे क्षण देणारा ‘माही’ ( MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. निळ्या रंगाची जर्सी घालून सर्वांच्या पसंतीस आलेल्या झारखंडचा सुपुत्र धोनी आपल्याला यापुढे आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळताना दिसणार नाही. पण देशवासीयांचे मन अद्याप भरलेले नाही. ‘माहीसाठी फेअरवेल सामना रांची येथे झाला पाहिजे. संपूर्ण जग याचे साक्षीदार असेल. संपूर्ण झारखंड वतीने त्याचा पाहुणचार केला जाईल. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने () माहीसाठी फेअरवेल सामना आयोजित करावा, असे आवाहन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे.

धोनीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली

एमएस धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. (MS Dhoni Instagram Post). व्हिडिओमध्ये धोनीच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची क्षणचित्रे आहेत. आणि त्याला ‘मैं पाल दो पल का शायर हूं …’ आणि ‘कभी कभी’ या गाण्यांची पार्श्वभूमी आहे. सुप्रसिद्ध गायक मुकेशच्या यांच्या आवाजातील ही गाणी आहेत. ४ मिनिटे ७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत.

धोनी सध्या चेन्नईत

धोनी शुक्रवारी १४ ऑगस्टला रांचीहून चेन्नईला रवाना झाला. सोबत मोनू कुमारही गेले. चेन्नई सुपर किंग्जने १५ ऑगस्टपासून एम चिदंबरम स्टेडियमवर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. धोनीचे इतर खेळाडू साथीदारही तिथे पोहोचले आहेत. चेन्नईला जात असताना दीपक चाहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्यात महेंद्रसिंग धोनीही दिसतोय. धोनीचे चाहते आता आयपीएल २०२० ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here