लखनऊ : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली असून ‘प्लेऑफ’मध्ये नाट्यमय प्रवेशही झाला आहे. यामुळे सहाजिकच आत्मविश्वास दुणावला असून याचा फायदा मुंबईला आज, बुधवारी लखनऊ सुपर जायटन्सविरुद्धच्या आयपीएल टी-२० स्पर्धेच्या ‘एलिमिनेटर’मध्ये होईल.

गेल्या मोसमात मुंबईची अखेरच्या क्रमांकावर घसरण झाली होती. यंदाही सुरुवात निराशाजनकच होती; पण मोक्याच्या क्षणी फलंदाजांना सूर गवसला. त्यात गुजरातने बेंगळुरूवर मात केल्याने मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला. एकूणच मुंबई इंडियन्सला यंदा खऱ्या अर्थाने संजीवनी मिळाली असून याचा पूरेपूर फायदा उठवणे या संघातील खेळाडूंच्याच हातात आहे. अर्थात यासाठी चाकोरीबाहेर पाऊल ठेवून लखनऊविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

IPL 2023: पंड्या चारी मुंड्या चीत, Dhoniचा मास्टरप्लॅन, फिल्डिंग बदलून धाडलं माघारी; Video तुफान व्हायरल
दर्जेदार वेगवान गोलंदाजाची पोकळी मुंबईला यावर्षी सातत्याने जाणवत आहे. जसप्रीत बुमराह जायबंदी असल्याने ते सहाजिकच आहे; पण यावर तोडगा शोधणे या संघास जमलेच नाही. आतापर्यंतच्या वाटलाचील फलंदाजांच्या कामगिरीचा वाटा मोठा आहे.

लखनऊने गेल्यावर्षीही प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता; पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले होते. लखनऊसाठी जमेची बाब म्हणजे नियमित कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थितीतही या संघाने कामगिरी उंचावली. श्रेय अर्थातच बदली कर्णधार कृणाल पंड्याच्या सुपीक डोक्याचे कृणालने हाताशी असलेल्या खेळाडूंचा हुशारीने वापर करून घेत, संघात चैतन्य फुंकले.

ही ‘एलिमिनेटर’ची लढत ज्या लखनऊच्या मैदानावर होते आहे, तिथे साखळीतील लढतीत मुंबईला चेन्नईकडून दारूण पराभवास सामोरे जावे लागले होते. त्या लढतीचे व्हिडीओ लखनऊने नक्कीच अभ्यासले असतील. मुंबईकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज नाहीत हेदेखील लखनऊच्या एव्हाना लक्षात आले असेलच. या कमकुवत दुव्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न कृणाल आणि कंपनी करेल.

विजय शंकर मांकडिंग आऊट होता होता वाचला, दीपक चहरच्या चालाखीवर धोनीने दिली अशी रिअ‍ॅक्शन
लखनऊची बाजू

– लखनऊच्या क्विंटन डीकॉकने गेल्या दोन डावांत आक्रमक ९९ धावा फटकावल्या आहेत. डीकॉकची भूमिका लखनऊच्या यशात महत्त्वाची असेल

– लीगच्या उत्तरार्धात फॉर्मात आलेल्या मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान लखनऊपुढे आहे

– लखनऊ पुन्हा एकदा लेगस्पिनर रवी बिश्नोईवर (१४ सामन्यांत १६ विकेट) मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. कर्णधार कृणाल पंड्याचाही त्याच्यावर विश्वास आहे

– लखनऊकडे गोलंदाजीत नवीन उल हक, आवेश खान आणि बदली कर्णधार कृणाल पंड्या असे पर्याय आहेत

– मार्कस स्टॉइनिस (१४ सामन्यांत ३६८ धावा), काइल मेयर्स (२६१ धावा) आणि निकोलस पूरन (३५८) असे फलंदाजीचे पर्याय लखनऊकडे आहेत

– लीगमधील लढतीत लखनऊने चेन्नईवर मात केली तेव्हा मेयर्स विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याचा देशबांधव निकोलस पूरन याच्यावरील जबाबदारीही आता वाढली आहे

मुंबईची बाजू

– मुंबईच्या यशात सूर्यकुमार यादवची भूमिका महत्त्वाची असेल. त्याने गुजरात टायटन्ससारख्या फॉर्मात असलेल्या संघाविरुद्ध ४९ चेंडूंत नाबाद १०३ धावांची खेळी केली होती

– पीयूष चावलासारख्या अनुभवी गोलंदाजांचे फॉर्मात असणे मुंबईसाठी शुभवार्तेप्रमाणेच असून, यंदा सर्वाधिक विकेट टिपणाऱ्या गोलंदाजांच्या सूचीत पीयूष चावलापुढे फक्त दोनच गोलंदाज आहेत

– ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचे मुंबईच्या यशात महत्त्वाचे योगदान आहे. हैदराबादविरुद्धच्या लढतीत विजय आवश्यक होता, तेव्हा त्याने नाबाद शतक केले. त्य़ाचा फॉर्म लखनऊच्या गोलंदाजांना धडकी भरविण्यास पुरेसा आहे

– ग्रीन (३८१ धावा), ईशान किशन (४३९) आणि फॉर्म गवसलेले सूर्यकुमार यादव (एक शतक, एक अर्धशतक आत्तापर्यंत ५११ धावा) आणि रोहित शर्मा (३१३) हे मुंबईचे फलंदाजीतील आधारस्तंभ आहेत

मुंबई वि. लखनऊ

वेळ : संध्याकाळी ७.३० पासून

ठिकाण : अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनऊ

प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

नाणेफेकीचा कौल : सामन्याच्या उत्तरार्धात खेळपट्टी आणखी संथ होईल, अशी अटकळ असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे

हवामानाचा अंदाज : तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास असेल

गेल्या पाच सामन्यांत : लखनऊचे दोन विजय, दोन पराभव, एक अनिकाली. मुंबईचे चार विजय, एक पराभव

आमनेसामने : एकूण लढती दोन, लखनऊचे विजय दोन

Dhoni चा एक मास्टरस्ट्रोक ज्यानं गुजरातचा हुकमी एक्का मैदानाबाहेर, हार्दिकचं सगळं गणित बिघडून गेलं

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here