नवी दिल्ली: क्रिकेटर शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोल करणे, तिला शिवीगाळ करणे, इतकेच नाही तर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याच्या मागणीसंदर्भात दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस दिली आहे. आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने गिलच्या शतकाच्या मदतीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केल्यानंतर गिल आणि त्याच्या बहिणीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत ट्रोल केले जात होते.आयोगाने या प्रकरणी नोटीस धाडली आहे. आयोगाने या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘शुबमन गिलच्या बहिणीसाठी ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या या पोस्ट अश्लील, धमक्या देणाऱ्या आणि अपमानजनक आहेत. तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे आणि हा गुन्हा आहे.’

करो या मरो सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर, रोहित शर्माने केला एकमेव मोठा बदल
ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, असेही पुढे नाटीशीत म्हटले आहे. आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ही नोटीस ट्विटरवर शेअर केली आणि दिल्ली पोलिसांना २६ मे पर्यंत केलेल्या कारवाईची माहिती देण्यास सांगितले आहे.

CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्जचा IPL फायनलमध्ये जाण्याचा विक्रम, जाणून घ्या चेन्नई कितव्यांदा पोहोचला फायनलला?
इंस्टाग्रामवर शाहनील अतिशय लोकप्रिय आहे. तिचे १ लाख १० हजार फॉलोअर्स आहेत. आयपीएलमध्ये, ती गुजरात टायटन्स संघाच्या इतर खेळाडूंच्या कुटुंबासह हँग आउट करताना दिसते. ती मैदानावर देखील दिसते. तिथून ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. या फोटोंवर ट्रोलर्स सातत्याने अनेक अपमानास्पद आणि अश्लील कमेंट करत आहेत.

चेन्नईचा नाद करायचा नाय… CSK IPL Finals मध्ये दाखल, गतविजेत्या गुजरातवर मोठा विजय
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला रोखल्याबद्दल काही वापरकर्त्यांनी शुभमन गिलला लक्ष्य केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here