नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने शनिवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले. खरत धोनी कालच आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी चेन्नईत दाखल झाला होता. धोनीला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहता येईल याचा आनंद चाहत्यांना झाला होता. तेव्हाच त्याने हा निर्णय घेतला.

वाचा-
खर तर धोनी गेल्या एक वर्षाहून अधिक काळ भारतीय संघाकडून खेळला नाही. स्वत:ला क्रिकेटपासून दूर ठेवणाऱ्या धोनीने भविष्यातील योजनेबद्दल काही सांगितले नव्हते. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्यानंतर धोनी संघाबाहेर गेला.

वाचा-
धोनीच्या वर्ल्ड कप कामगिरीवर अनेक जण नाराज होते. त्यामुळे त्याने निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिला जात होता. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सेमी फायनलमधील रन आउटमधील बोलताना म्हणाला होता आज देखील पश्चाताप होतोय.

वाचा-
सेमी फायनल सामन्यात धोनीच्या रन आऊटबद्दल आणि त्याला इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याबद्दल अनेकांनी टीका केली होती.

त्यावर धोनी म्हणाला होता, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मी धावाबाद झाल्याचे दु:ख अजून माझ्या मनात आहे. तेव्हा मी का उडी मारली नाही. ‘मी स्वत:ला आजही प्रश्न विचारतो. तेव्हा मी डाईव्ह (उडी) का मारली नाही. ते दोन इंच मला नेहमी सांगत असतात की, एम.एस.धोनी तू उडी मारू शकला असतास.’

वाचा-

काय झालं होतं त्या ओव्हरमध्ये
वर्ल्ड कपमधील साखळी स्पर्धेत भारताची कामगिरी शानदार होती. त्यानंतर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला २४० धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. त्यानंतर धोनीने रविंद्र जडेजासोबत भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले. अखेरच्या दोन ओव्हर शिल्लक असताना धोनीने ४९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दुहेरी धावा घेताना मार्टिन गुप्टिलच्या थ्रोवर धोनी बाद झाला. गुप्टिलच्या त्या थ्रोने भारतीय संघाचे आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंगले.

अखेर धोनीच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची खेळी ही त्या रनआउटची ठरली. त्यानंतर तो कधीच भारतीय क्रिकेट संघात दिसला नाही. या आयपीएलनंतर त्याला पुन्हा संघात जागा मिळेल असे वाटले होते. पण धोनीने निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here