नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता पुढे काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. नेहमी प्रमाणे धोनीने याबद्दल काहीही सांगितले नाही. पण धोनीने निवृत्ती घेऊन २४ तास उलटण्याआधी त्याला एक खास ऑफर मिळाली आहे.

वाचा-
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील एका खासदाराने धोनीला २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. धोनीने आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही. पण झारखंडमध्ये धोनीची लोकप्रियता पाहता राजकारणात देखील त्याला मोठे यश मिळू शकते. यामुळे भाजपच्या नेत्याने धोनीला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.

वाचा-

धोनी निवडणूक लढवणार का?
भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीच्या निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी एक सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की. एमएस धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अन्य कोणत्याही गोष्टीतून नाही. लढण्याचे कौशल्य आणि टीमचे नेतृत्व करण्याची क्षमता त्याने क्रिकेटमध्ये दाखवली आहे. याची सार्वजनिक आयुष्यात गरज आहे. त्याने २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवावी. भाजप नेत्याच्या या ट्विटवरून धोनीला पक्षाचे तिकीट देण्याचा इशारा स्पष्टपणे दिसत आहे.

वाचा-

दोन वर्षापूर्वी अमित शहा भेटले होते
भाजपने दोन वर्षापूर्वी धोनीशी संपर्क केला होता. तेव्हा संपर्क से समर्थन नावाचे अभियान सुरू केले होते. भाजपते तत्कालीन अध्यक्ष आणि सध्यचे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी धोनीची भेट घेतली होती.

वाचा-

धोनीच्या निवृत्तीवर अमित शहा म्हणाले…
“मैं आशा करता हूं कि वह आने वाले दिनों में भारतीय क्रिकेट को मजबूत करते रहेंगे। भविष्‍य की योजनाओं के लिए उन्‍हें शुभकामनाएं। वर्ल्‍ड क्रिकेट हेलिकॉप्‍टर शॉट को मिस करेगा माही!”

वाचा-
धोनीने इस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याचे शनिवारी जाहीर केले. आता तो १० सप्टेंबर पासून युएईमध्ये खेळताना दिसेल. गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये झालेली न्यूझीलंडविरुद्धची सेमीफायनल मॅच त्याच्या करिअरमधील अखेरचा सामना ठरला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here