वाचा-
धोनीने संघाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केल्यापासून अनेकांना संधी दिली. अनेक खेळाडूंना धोनीने चौकटी बाहेर जाऊन संधी दिली आणि त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार झाले. धोनीने संधी दिलेल्या खेळाडूंपैकी एक म्हणजे भारतीय संघाचा उपकर्णधार होय. धोनीनेच रोहितला चौथ्या क्रमांकावरून सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. प्रथम रोहित अपयशी ठरला. पण धोनीने काही काळानंतर त्याला पुन्हा संधी दिली. त्यानंतरचा रोहितचा इतिहास सर्वांना माहीत आहे.
वाचा-
धोनीच्या निवृत्तीवर पोस्ट करताना रोहित म्हणाला, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली व्यक्ती. क्रिकेट आणि त्याच्या जवळच्या लोकांवर धोनीचा मोठा प्रभाव पडला. त्याच्याकडे एक व्हिजन होती आणि त्याला माहित होते की संघ कसा तयार केला जातो. आम्ही निश्चितपणे त्याला ब्लू जर्सीमध्ये मिस करू पण यलो जर्सीमध्ये तो नेहमीच दिसेल. तर १९ तारखेला नाणेफेकसाठी भेटू!
वाचा-
आयपीएलचा १३वा हंगाम १९ तारखेपासून युएईमध्ये होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारी यलो आर्मी अर्थात चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील चार वेळा विजेतपद मिळवणारी मुंबई इंडियन्स यांच्यात पहिली लढत होईल. गेल्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये रोहितच्या संघाने चेन्नईचा एक धावाने पराभव केला होता.
वाचा-
रोहितने सुरेश रैनाच्या निवृत्तीवर अश्चर्य व्यक्त केले. तुझे क्रिकेट करिअर चांगले होते. निवृत्ती देखील चांगली व्हावी. मला आठवते तु जेव्हा संघात आला होतास तो क्षण. भविष्यासाठी शुभेच्छा, असे रोहितने म्हटले आहे.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times