वाचा- वाचा-
भारतीय संघ एखाद्या कठीण प्रसंगात असला तर विराट नेहमी धोनीचा सल्ला घ्यायचा. इतक नव्हे तर डीआरएसबाबतचा निर्णय घेण्याआधी विराट नेहमी धोनीचे मत विचारात घ्यायचा. धोनीच्या निवृत्तीवर त्याचे चाहते निराश आणि भावूक झाले. पण दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेटपटू आणि चाहते त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
वाचा- वाचा-
धोनीने शनिवारी निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराटने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. पण आज विराटने बीसीसीआयच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
वाचा-
धोनीबद्दल बोलताना विराट भावूक झाल्याचे व्हिडिओत दिसते. धोनीने मला नेहमी सपोर्ट केला त्यासाठी मी आभारी आहे. करिअरच्या सुरुवातीला माझ्यावर विश्वास दाखवला. तुझ्यामुळेच मी कर्णधार म्हणून खुप काही शिकू शकलो. आम्ही सर्व जण तुला मीस करू आणि मी नेहमी सांगत आलो आहे आणि आता पुन्हा सांगतो की, तुच माझा कर्णधार होतास आणि काम राहशील.
वाचा-
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर विशेषत: धोनीच्या चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
वाचा-वाचा- वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times