लंडन: आयपीएलचा १६वा हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. क्वॉलिफायर २ आणि फायनल अशा दोन लढती शिल्लक आहेत. अशाच क्रिकेट विश्व खडबडून जागे होईल अशी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉय याच्या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे.गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या या ३२ वर्षीय फलंदाजाने राष्ट्री संघासोबतचा करार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयने आता फक्त फ्रॅचाइजी क्रिकेट खेळण्याचे ठरवले आहे. रॉयने अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगच्या उद्घाटन हंगामात भाग घेण्याचे ठरवले आहे. ही लीग १३ जुलै ते ३० जुलै या काळात होणार आहे.

जेसन रॉय सध्या इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करत आहे, जेणेकरून त्याला बोर्डासोबतच्या करारातून मुक्त केले जाईल. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार रॉयसह इंग्लंड क्रिकेट संघातील त्याचा सहकारी रॉसी टॉपली याने देखील लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्याचे ठरवले आहे. अर्थात रॉसीचा निर्णय त्याच्या खांद्यावरील शस्त्रक्रियेवर ठरणार आहे. ईसीबी वर्षाच्या करारासाठी साधारणपणे ६६ हजार पाउंड देते. जागतिक क्रिकेट बोर्डामध्ये सर्वाधिक मानधन देणाऱ्या बोर्डांमध्ये ईसीबीचा समावेश होतो.

GT vs MI : कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी; गुजरातच्या घरच्या मैदानावर मुंबई समोर दुहेरी आव्हान
अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगची सुरुवात १३ जुलैपासून टेक्सास येथे होणार आहे. या लीगमध्ये आयपीएल आणि ऑस्ट्रेलियातील संघ आहेत. रॉय एलए नाइटरायडर्सकडून खेळणार आहे. पण त्यासाठी त्याला राष्ट्रीय संघासोबतचा करार मोडावा लागले. विशेष म्हणजे ही लीग आणि इंग्लिश टी२० ब्लास्टची सेमीफायनल आणि फायनल एकाच वेळी होणार आहे. इंग्लंडसाठी ही थोडी काळजी करणारी गोष्ट आहे. जर मेजर क्रिकेट लीगचा विस्तार झाला तर त्याचा परिणाम द हंड्रेडवर होऊ शकतो. त्यामुळे ईसीबीकडून खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे टाळले जाऊ शकते.

Akash Madhwal: आकाश मढवाल कसा काय ‘यॉर्कर किंग’ झाला? गुरू वसीम जाफरने सांगितली रियल स्टोरी
ईसीबीचा करार ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असोत. जर एखाद्या खेळाडूला करारातून बाहेर पडायचे असेल तर त्याला २० हजार पाउंड द्यावे लागतात. मेजर क्रिकेट लीग मधील सॅलरी कॅप ९३ हजार पाउंड आहे.

गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर राहुन मुंबईचा संघ फसला; कारण जो एलिमिनेटर खेळतो तो कधीच…
जेसन रॉय म्हणाला….

मी जेव्हा तरुण होतो आणि तेव्हा तुम्ही मला विचारता तर मी म्हटले असते की मला देशाकडून १०० कोसटी खेळायच्या आहेत. आता विचारला तर मी सांगेन की मला जास्ती जास्त आयपीएलचे हंगाम खेळायचे आहेत. मला वाटत नाही की आपल्या आवडीची गोष्ट सांगण्यास संकोच बाळगावा.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

3 COMMENTS

  1. На портале [url=https://mikro-zaim-online.ru/]Mikro-Zaim-Online.ru[/url] мы соединили два важных аспекта – займы на карту и интересные статьи о финансах. У нас вы найдете лучшие МФО, где можно получить займы с удобными условиями и быстрым решением.

    Кроме того, наш сайт предлагает полезные статьи о финансовых стратегиях, советы по эффективному планированию бюджета и многие другие темы. Расширьте свои знания в области финансов и сделайте осознанные финансовые решения.

    Не откладывайте свои финансовые потребности на потом. Посетите [url=https://mikro-zaim-online.ru/]Mikro-Zaim-Online.ru[/url], получите займ на карту и узнайте больше о финансовых стратегиях и финансовом благополучии!

  2. [url=https://ru.farmpro.work/]как найти работу в даркнете[/url] – вакансии гидра, работа кладменом на гидре

  3. [url=https://go.blcksprt.cc/]блэкспрут сайт[/url] – blacksprut net, blacksprut официальный сайт

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here