अहमदाबाद : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्सचे तिकीट घेण्यासाठी गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चांगलीच झुंबड उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याचा धोका होता. हे पाहून वर्ल्ड कप लढतींसाठी ई-तिकीट ग्राह्य धरण्याबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विचार सुरू केला आहे असे समजते.गुरुवारी अंतिम सामना तसेच मुंबई-गुजरात लढतीचे आरक्षित तिकीट घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. त्यावेळी काहींना उन्हाचाही त्रास झाल्याची चर्चा आहे. तिकिटांची ऑनलाइन विक्री झाली होती, पण प्रत्यक्ष तिकीट घेण्यासाठी स्टेडियम परिसरात चाहते जमले होते. नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता विक्रमी असली तरी, स्टेडियमची प्रवेशद्वारे तुलनेत लहान आहेत. त्यामुळे जास्त गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गर्दी का उसळली?

ऑफलाइन तिकिटांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती, परंतु ज्यांनी ऑनलाइन तिकीट बुक केले होते त्यांनी काउंटरवर जाऊन क्यूआर कोड दाखवावा आणि तिथून तिकीटाची हार्ड कॉपी घ्यावी, असे सांगण्यात आले. आदल्या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तिकीट कलेक्शनसाठी खिडकी उघडण्यात आली होती, त्यामुळे स्टेडियमबाहेर अनेकांची गर्दी उसळली होती.

नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर मोठी चेंगराचेंगरी, BCCIने हे काय केलं? VIDEO होतोय व्हायरल
प्रेक्षक एकमेकांवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. गर्दीत काही जण खाली पडले, पण त्यांची पर्वा न करता काही जण त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाताना दिसले. या चेंगराचेंगरीत महिलाही अडकल्या होत्या. स्टेडियमबाहेर बीसीसीआयच्या या हलगर्जीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, मोदी स्टेडियम परिसरात तिकिटांसाठी उडालेली झुंबड पाहून वर्ल्ड कप लढतींच्यावेळी काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या स्टेडियमवर स्पर्धेतील उद्घाटनाची तसेच अंतिम लढत अपेक्षित आहे. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान सामनाही अपेक्षित आहे. चेन्नईत या प्रकारचा कोणताही प्रश्न नव्हता.

आय एम सॉरी विराट सर.. नवीन उल हकनं मागितली कोहलीची माफी? ट्वीट चर्चेत

अर्थात त्यानंतरही आम्ही वर्ल्ड कप लढतीच्यावेळी ई-तिकिटांच्या पर्यायाबाबत विचार करीत आहोत, असे भारतीय क्रिकेट बोर्डातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ऑनलाइन तिकीट आरक्षित केल्यानंतरही प्रत्यक्ष तिकीट घेण्याची सक्ती असल्यामुळे चाहत्यांना किमान एक ते दोन दिवस शहरात अगोदर येणे भाग पडत आहे. त्यावरही ई-तिकीट हा पर्याय असेल, असे मानले जात आहे.

IPL 2023 : जिथून सुरुवात झाली तिथंच…, मुंबई आयपीएलच्या बाहेर जाताच चेन्नईचं भन्नाट ट्विट चर्चेत

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here