तिलक वर्माला जाळ्यात अडकवलं
तिलक वर्मानं जोरदार फटकेबाजी सुरु करत गुजरातचं टेन्शन वाढवलं होतं. त्यानं ३ षटकार आणि ५ चौकारांसह ४३ धावा केल्या. तिलक वर्मा धोकादायक ठरणार असं वाटत असताना हार्दिक पांड्यानं राशिद खानला गोलंदाजीसाठी बोलावलं. राशिदच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर तिलक वर्मा बाद झाला. ही हार्दिकची खेळी यशस्वी ठरली.
बॉलिंगमध्ये बदल अन् ग्रीनची विकेट
कॅमरुन ग्रीनं आणि सूर्यकुमार यादवनं मुंबईचा डाव सावरला होता. राशिद खान आणि नूर अहमद यांच्या विरोधात ते चांगल्या प्रकारे धावा काढत होते. ग्रीन आणि सूर्युकमारची ५२ धावांची भागिदारी देखील झाली होती. नेमक्या याच वेळी हार्दिकनं १२ वी ओव्हर जोशुआ लिटल याला दिली. त्यानं ग्रीनला ३० धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.
मोहित शर्माला आणलं अन् सूर्यकुमार जाळ्यात अडकला
कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर मुंबईच्या आशा सूर्यकुमार यादववर होत्या. सूर्यकुमार यादवनं दोन षटकार आणि सात चौकार लगावत ६१ धावा केल्या. हार्दिकनं पंधरावी ओव्हर मोहित शर्माला दिली. सूर्यकुमार यादवनं मोहितला खणखणीत षटकार लगावला. सूर्या मुंबईला विजयापर्यंत नेईलं असं वाटत असताना त्यानं सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला अन् त्यात तो बाद झाला. यानंतर विष्णू विनोद देखील त्याच ओव्हरमध्ये बाद झाला. मोहित शर्मानं यानंतर ख्रिस जॉर्डन, पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय यांना बाद केलं अन् गुजरातनं विजयावर नावं कोरलं.
हार्दिक पांड्यानं वेळोवेळी केलेल्या गोलदांजीमधील बदलाचा गुजरातला फायदा झाला. गुजरात आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला तर मुंबईचं यंदाच्या पर्वातील आव्हानं संपुष्ठात आलं.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More