मुंबई: आयपील २०२३ मध्ये गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीला प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखले आणि मुंबई इंडियन्सच प्लेऑफचा मार्ग मोकळा झाला. त्याच शुभमनच्या शतकाच्या जोरावर गुजरातने २६ मे रोजी मुंबई इंडियन्सला बाहेरचा रस्ता दाखवला आणि गुजरातने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. एकंदरित गिल त्याचा फॉर्म कायम राखून आहे आणि गुजरातसाठी तो हिरो ठरतोय. शुभमनचे नाव आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे, ते कारण म्हणजे ‘सारा’. अभिनेत्री सारा अली खान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर या दोघींशीही त्याचे नाव जोडले जातेय.

Gautami Patil: ‘पाटलीण हायेस, रुबाबात-बिनधास्त नाच!’ किरण मानेंचा गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट
नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमनने ४९ चेंडूमध्ये शतक ठोकले, त्याने १२९ धावांची खेळी करत मुंबईविरोधात २३३ धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. हे लक्ष्य गाठताना मुंबईचा संघ मागे पडला आणि सलग दुसऱ्यांदा गुजरातची टीम आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. या मोठ्या विजयानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या त्या शुभमन गिलवर!

द केरला स्टोरीचं प्रमोशन आलं अंगाशी; अचानक तब्येत बिघडल्याने सिनेमाचे दिग्दर्शक रुग्णालयात
एकापाठोपाठ एक जबरदस्त खेळीनंतर गिल चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेले की त्याचे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत ब्रेकअप झाले, आता सारा तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा त्याचे नाव जोडले जातेय. हे नाव जोडले जाण्यामागे सचिनसोबतचा शुभमनचा एक फोटो आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोत दिसते आहे की सचिन काहीतरी शुभमनला सांगत आहे आणि शुभमन ते सर्वकाही शांतपणे ऐकतोय. हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या क्वालिफायर सामन्यादरम्यानचा फोटो आहे.

यावर नेटिझन्सनी फारच विनोदी कमेंट्स केल्या आहेत. सचिन शुभमनला काय सांगत असेल याबाबत मजेशीर अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ‘या सीझनमध्ये ५ सेंच्युरी केल्यास तरंच लग्न होईल, नाहीतर विसरुन जा’. अन्य एकाने लिहिले की, ‘वर्ल्डकप जिंकलास तर लग्न ठरेल’. तर एका युजरने लिहिले की, ‘सचिन असे म्हणतोय की सॉरी शुभमन आजच्या मॅचनंतर साराचा हात तुझ्या हातात नाही देऊ शकत’.

शुभमन आणि साराच्या लग्नावरुनच सचिन काहीतरी बोलत असावा, अशा मजेशीर कमेंट्स या फोटोवर आल्यात. काहींनी असेही म्हटले की सचिन त्याला धमकावत असेल की माझ्या मुलीपासून दूर राहा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here