वृत्तसंस्था, अहमदाबाद : संघातील प्रमुख गोलंदाज वेळेत फिट झाले नाहीत, तर त्यांच्याऐवजी बदली गोलंदाजांचा विचार करू, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी दिली. यावेळी दुसऱ्या क्वालिफायरच्या लढतीत गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्याने मुंबईचे आयपीएल टी-२० स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर आणि झाय रिचर्डसन असे मुंबईचे तीन मुख्य गोलंदाज यंदा दुखापतीमुळे स्पर्धेत भाग घेऊ शकले नाहीत. आपल्याला आताच मुंबईच्या कामगिरीचे विश्लेषण करायचे नाही, कारण सध्या वाद टाळायचे आहेत, असे स्पष्ट मत बाऊचर व्यक्त करतात.

या आयपीएलमध्ये मुंबईकडून प्रतिस्पर्ध्यी संघांना चारवेळा दोनशेपेक्षा जास्त धावांची खैरात वाटली गेली. हा खरेतर नकोसा विक्रम! पण तो आता मुंबईच्या नावावर जमा झाला आहे. शुक्रवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातनेही मुंबईच्या दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.

Shubman Gill : मुंबई विरुद्धची तडाखेबंद खेळी कशी साकारली, शुभमन गिलनं रहस्य उलगडलं, चेन्नईचं टेन्शन वाढणार?
प्रशिक्षक म्हणतात…

-यंदा दोन प्रमुख गोलंदाजांविना मुंबई इंडियन्सला खेळावे लागले

-महत्त्वाच्या गोलंदाजांची पोकळी भरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला

-जायबंदी गोलंदाज भविष्यात फिट होतील, अशी आशा; पण ते फिट होणार नसतील, तर पर्याय शोधावे लागतील

-बुमराह, आर्चर यांचा दर्जा वरचा आहेच, पण दुखापतीमुळे या दोघांचे योगदान लाभले नाही

-महत्त्वाच्या गोलंदाजांविना संघाचा मारा निष्प्रभ होणे सहाजिकच आहे. याबाबत मी कुणाला दोष देत नाही; कारण खेळात दुखापती होतच असतात

‘काहींच्या भवितव्याबाबत बोलावे लागेल’

बाऊचर हे अगदी सुरुवातीपासूनच रोखठोक विचार मांडतात. यावेळी त्यांनी थोडाफार तसाच पवित्रा घेतला होता. ‘मुंबईच्या यंदाच्या मोसमातील कामगिरीचे मोजमाप मी नंतरच करेन. आता नको; कारण सध्या वाद टाळायचे आहेत. कामगिरीबाबत अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होऊ शकते; पण आता टीका करणे वेडेपणाचे ठरेल. आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल, अन् भावूक न होता क्रिकेटला साजेसे निर्णय घ्यावे लागतील. मात्र ते आता नको, वातावरण शांत झाले की पुढील गोष्टींचा पाठपुरावा करू. जसे खेळाडूंच्या फिटनेसबाबतची माहिती मिळवायची आहे, तसेच काही खेळाडूंच्या भवितव्याबाबतही बोलावे लागेल’, असे सांगत बाऊचर यांनी संघव्यवस्थापनाच्या पुढील नियोजनाची कल्पना दिली.

आयपीएलचा समारोप सोहळा नेमका किती वाजता सुरु होणार व काय पाहायला मिळणार जाणून घ्या
दुखापतींचा ससेमिरा

-पाठिच्या दुखापतीमुळे बुमराह आयपीएलला मुकला. त्याच्या पाठिवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करावी लागली

-ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसनही लीगसाठी फिट होऊ शकला नाही. त्याचा पाय दुखावला

-आयपीएल २०२३च्या दृष्टिकोनातून मुंबई संघव्यवस्थापनाने २०२२च्या आयपीएल लिलावात जायबंदी असूनही आर्चरला संघात घेतले.

-या लिलावाआधी हा आर्चर जवळपास एकवर्षापेक्षा जास्त काळ एल्बोच्या दुखापतीने त्रस्त होता

-२०२२च्या मे महिन्यात आर्चरला पाठदुखी सुरू झाली, ज्यामुळे तो इंग्लंडमधील स्थानिक मोसमासही मुकला होता

-यातून थोडाफार सावरल्यानंतर आर्चरने द. आफ्रिका टी-२० लीगमध्ये एमआय केपटाऊन संघाचे प्रतिनिधित्व केले.

-त्यानंतर आयपीएल खेळून इंग्लंड संघासाठी फिटनेस सिद्ध करावा, असा त्याचा विचार होता

-परिपूर्ण फिटनेस नसल्याने आर्चर आयपीएल सलामीला चेन्नईविरुद्ध खेळू शकला नाही

-आर्चर नंतरच्या लढती खेळला; पण लय गवसलीच नाही

-यादरम्यानही आर्चर बेल्जियमला गेला. जिथे त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाली. तिथून लीगमध्ये परतला, पण ऐन सामन्यात पुनरागमन झालेच नाही

-तो आयपीएलसह अत्यंत महत्त्वाच्या अॅशेस मालिकेलाही मुकला. भारतात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी तरी तो फिट होतो का ते बघायचे

आयपीएल फायनलच्या दिवशी पाऊस पडला तरी किती षटकांचा सामना होऊ शकतो, जाणून घ्या…

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here