जसजसा सामना पुढे जाईल तसतशी फिरकीपटूंना थोडी मदत मिळू शकते. दव हा एक मोठा घटक असू शकतो आणि यामुळे कर्णधार नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करू शकतो. या मोसमात खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९३ आहे. अशा परिस्थितीत रविवारचा दिवसही यापेक्षा वेगळा नसेल.
आयपीएल २०२३ मध्ये या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला तीन वेळा विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच सामने जिंकले आहेत. या मोसमात काही उच्च-स्कोअरिंग सामनेही पाहायला मिळाले आहेत. स्टेडियमच्या इतिहासानुसार, पाठलाग करणाऱ्या संघांना आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना समान यश मिळते.
मात्र, येथे खेळल्या गेलेल्या मागील पाच सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. यासह अंतिम फेरीचे दडपण असेल. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
नरेंद्र मोदी स्टेडियम आयपीएल रेकॉर्ड्स
एकूण सामने – २६
प्रथम फलंदाजी करणारा संघ – १३
लक्ष्याचा पाठलाग करणारे संघ – १३
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या – १९३ धावा
सरासरी पॉवरप्ले स्कोअर – ४७ धावा
मागील ५ सामन्यांतील सरासरी डेथ ओव्हर स्कोअर – ६०
सर्वोच्च धावसंख्या – २३३/३ (GT vs MI, 2023)
सर्वाधिक धावांचा पाठलाग २०७/७ (KKR vs GT, 2023
सर्वात कमी धावसंख्या – १०२/१० (RR विरुद्ध SRH, 2014)
सर्वात कमी धावसंख्या वाचवली – १३० धावा (DC vs GT, 2023)
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More