अहमदाबाद: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२३चे विजेतेपद मिळवण्याची लढत होत आहे. गुजरातच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या लढतीत विक्रमी ५ वे विजेतेपद मिळवण्यासाठी धोनी आणि कंपनीला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या म्हणजे क्वॉलिफायर लढतीत चेन्नईने गुजरातचा पराभव केला असला तरी ही लढत चेन्नईच्या खरच्या मैदानावर झाली होती. तेथे धीमी विकेट होती आणि अहमदाबादमध्ये जलद विकेट असेल. त्यामुळेच धोनीपुढे पाचवे विजेतेपद मिळवणे तेवढे सोपे असणार नाही.अंतिम सामन्यातील दोन्ही संघ तगडे आहेत. एका बाजूला धोनीने ४ विजेतेपद मिळवली आहेत आणि चेन्नईच्या संघाने सातत्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. १४ पैकी ९ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे फायनल खेळण्याचा सर्वाधिक अनुभव त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला हार्दिकच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या हंगामात गुजरातने गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवले तसेच फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. अशाच धोनी अंतिम सामन्यात एक मोठा पत्ता बाहेर काढू शकतो आणि कदाचित धोनीच्या या गेम प्लॅनचा गुजरात विचार देखील करणार नाही.

मुंबई इंडियन्समुळे होत आहे IPLमध्ये ऐतिहासिक फायनल; इतिहासात प्रथमच होत आहे अशी फायनल मॅच
फायनल मॅचमध्ये धोनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. अंतिम ११ संघात धोनी बेन स्टोक्सला संधी देण्याची शक्यता आहे. मोईन अलीच्या जागी स्टोक्स संघात येऊ शकतो. गेल्या १० सामन्यात मोईन अलीला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाज म्हणून त्याने फक्त ३ विकेट घेतल्या आहेत. अहमदाबादची खेळपट्टी फिरकीसाठी फार मदत करत नाही. दुखापतीमुळे स्टोक्स गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर होता. पण त्यानंतर टीम कॉम्बिनेशनमुळे त्याला संघात स्थान मिळाले नव्हते.

CSK vs GT Final Live Score: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स फायनल लाइव्ह अपडेट
बेन स्टोक्स आह मोठ्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले होते. २०२१च्या टी-२० वर्ल्डकपमंध्ये देखील त्याने नाबाद अर्धशतक झळकावले होते. या दोन्ही फायनलमध्ये स्टोक्सला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. धोनी संघात एक असा खेळाडू आणू शकतो ज्याला माहिती आहे मोठ्या मॅचमध्ये कसे विजय मिळवायचे.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here