नवी दिल्ली: यशस्वी जयस्वालची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड तीन जूनला विवाहबद्ध होणार असल्यामुळे भारतीय संघात हा बदल करण्यात आल्याचे समजते. जगज्जेतेपदाची लढत सात ते अकरा जूनदरम्यान लंडनमध्ये होणार आहे.भारतीय संघात ऋतुराज हा राखीव सलामीवीर होता. मात्र, विवाहामुळे आपण ५ जूनलाच संघात दाखल होऊ शकतो, असे ऋतुराजने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले. त्याच्याऐवजी आयपीएलमध्ये चांगल्या धावा केलेल्या यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली. यशस्वीकडे ब्रिटनचा व्हिसा आहे. त्यामुळे तो काही दिवसांत संघात दाखल होईल, असे सूत्रांनी सांगितले.

जिद्दीला सलाम! एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही; IPL फायनलच्या खऱ्या हिरोंचे कौतुक
यशस्वीने आयपीएलमध्ये १४ डावांत ६२५ धावा केल्या आहेत. त्याने या मोसमात एक शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. तो अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही; पण त्याने १५ प्रथम श्रेणी लढतींत ८०.२१ च्या सरासरीने १ हजार ८४५ धावा केल्या आहेत. यात त्याने नऊ शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. यंदाच्या रणजी मोसमात यशस्वीने पाच सामन्यांत ३१५ धाव केल्या. त्याने आयपीएलपूर्वी झालेल्या इराणी लढतीत शेष भारत संघातून खेळताना २१३ आणि १४४ धावा केल्या होत्या.

CSK vs GT: फायनल मॅच होण्याआधीच ठरला IPL 2023 विजेता; समोर आले चॅम्पियन संघाचे नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जून रोजी WTC ची फायनल मॅच होणार आहे. ओव्हल मैदानावर होणाऱ्या या लढतीसाठी भारताचे काही खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा WTCच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी पहिल्या WTC फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, ईशान किशन. राखीव : यशस्वी जयस्वाल, मुकेशकुमार, सूर्यकुमार यादव.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here